Tags » Art Of Living

Live long and happy. Learn to work hard and be uncomfortable.

I want to get back to fitness and longevity for a bit. I’m working on a project about longevity so it’s a lazy decision for me. 763 more words

Longevity

Stepping into Who I Am

My dear friend over at Single Working Mom inspired me to write about how we, as women, seem to lose ourselves in our effort to ‘fit’. 1,111 more words

Women

387) Thank You

Dear Social Media Friends,

I am giving below the account of my Social Media – Facebook Posts during 2014.

Spandane Articles:                     96

Spandane Poems:                         8… 55 more words

Spandane Articles

३८५) तडजोड:

३८५) तडजोड:

एका जंगलात फिरताना काढलेला हा फोटो आहे. सहज मनात विचार आला कि माणसाला ह्या झाडापासून खूप काही शिकता  येईल.

ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक अडथळे येतात, वेगळा विचार – वेगळी वाट चोखाळावी लागते. ज्या माणसाकडे योग्य वेळी तात्पुरती माघार घेण्याची, नवीन प्रयोग करण्याची – वेगळी वाट धरायची कला असते, तो माणूस आपले ध्येय गाठतोच.

जन्म आपल्या हातात नसतो पण कसे जगावे हे तर आपल्या हातात आहेना. !!!!

मित्रानो आपले ध्येय डोळ्यात जपू नका. अडचणींच्या अश्रू बरोबर ते वाहून जाईल. ध्येय हृदयात जपा, जेणे करून हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर ते तुम्हाला ध्येयाची आठवण देईल.

आजचा दिवस आपल्याला सुखाचा जावो. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी माझ्या शुभेच्छा.

 

सुधीर वैद्य

२०-१२-२०१४

Spandane Articles

३८४) झाड आणि पाठीचा कणा

      

३८४) झाड आणि पाठीचा कणा

सकाळी मी फिरायला जातो त्या रस्त्यावर बरीच  झाडे आहेत. ह्या वर्षी काही ठराविक झाडांवर एका रोगाने आक्रमण केले. त्यामुळे झाडाची पाने गळून गेली. झाडाचा रंग काळा झाला. फांद्या ठिसूळ झाल्या आणि सहजपणे पडू लागल्या. त्या रस्त्यावरून फार सतर्कपणे  जावे लागते.

काही दिवसापूर्वी नगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी ह्या वाळक्या झाडांच्या फांद्या कापल्या, जेणे करून कोणाला दुखापत होणार नाही. काही झाडे मुळापासून कापून टाकली. परंतु हे एक झाड त्यांनी कापले नाही. बहुतेक त्यांच्या मते हे झाड अजून मृत झाले  नाहीये.

आज सकाळी ह्या झाडाचा मी फोटो काढताना माझ्या मनात जे विचार आले तेच तुम्हाला सांगण्यासाठी ह्या पोस्टचे प्रयोजन.

आपले आयुष्य आणि झाड ह्यातील साम्य माझ्या नजरेसमोर आले. आपल्याही आयुष्यात अश्याच  अनेक समस्या येतात, नातेसंबंध पणाला लागतात, काही कुटुंबीय आपल्याला सोडून जातात, आपण दु:खी होतो, कधी खचून जातो.

आपला पाठीचा कणा  वाकतो कि काय अशी शंकासुद्धा मनात येते. पण मित्रानो, घाबरू नका, हे प्रसंगच असे असतात. देवाला नेहमी माणसाची परीक्षा घेण्याची हौस असते. आपला पाठीचा कणा  आणि मनाचा कणा ताठच  ठेवा.

आजचा दिवस आपल्या सर्वाना आणि कुटुंबियांना सुखाचा जावो आणि कोणत्याही परिस्थितीत आपला पाठीचा आणि मनाचा कणा ताठ राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य

१८-१२-२०१४

Spandane Articles

३८३) आयुष्यात सुखी होण्यासाठीचे मुलभुत प्रश्न

३८३) आयुष्यात सुखी होण्यासाठीचे मुलभुत प्रश्न

जर प्रत्येक माणसाने खालील प्रश्नांचा – वाक्यांचा गांभीर्याने विचार केला व प्रामाणिकपणे उत्तरे शोधली तर तो नक्की सुखी होईल किंवा कमी दु:खी होईल..

Spandane Articles