Tags » Gulzar

अर्शी!

            दिड एक वर्षापुर्वी मी काश्मीरला जाऊन आलो. आठवड्याभरापेक्षा जास्त काळ तिथं राहीलो पण भटकंतीचा फिल नाही. आता कधी कधी विचार करतो की माझ्याकडं त्या जागेचं काय शिल्लक राहीलंय. तर फोटोच्या चार पाच फ्रेम्सपेक्षा काहीच नाही. पहलगामच्या पहाडातला लीड्डरच्या पाण्याचा घोंगावणारा आवाज रात्री मध्यरात्री मला अजूनही जागा करतो. हजरत बलच्या दर्ग्यातली अनुभवलेली शांतता सूर्यास्ताला गोठून येते, कान्हा चौक पोलीस ठाण्यात कोल टेकणी बसलेले दोन एक पाकिस्तानी कैदी माझ्याकडे एखाद्या वस्तुसारखे बघत राहातात, तिथल्या आवारातले आळसावलेले सशाचे ते दोन तीन पिल्ले अजूनही पायात पडतील याची भीती वाटत राहाते आणि त्याच आवारातल्या एका घरातल्या दोन खोल्यांमधल्या अंधारात मी गुडूप होऊन जातो, लहानपणी आम्ही गावात लपाछपी खेळायचो आणि मी पाटलाच्या बावन्न दरवाजी वाड्यात गायब व्हायचो तसा.

पहलगामकडे जाताना माझ्या मांडीवर झोपी गेलेला जीव अजून तसाच पडून आहे असं वाटतं, अधूनमधून पांढरेशुभ्र पाण्याचे खळाळणारे अनेक प्रवाह येतात, जातात, मी त्यात वाहात जातो पण ना मला त्या प्रवाहाचा उगम सापडतो ना तवीचा किनारा. काही मात्र माझ्यात विसावत जातात, मग लगेचच एखाद्या ठिकाणी असंही होतं की एका आडरानात तीन सैनिक उभे आहेत, दूरपर्यंत काही दिसणार नाही एवढी निर्मनुष्य वस्ती, तरीही तिघे जण तीन दिशेला, रायफल्स ताणून उभे आहेत, निश:ब्द, त्यांच्या बाजुला एक पाण्याची बिंदगी, अगदी शेताच्या बांधावर असते तशी, ते काय न्याहाळत असतील कोण जाणे? मृत्यू, जीवन की त्यांच्या घरातला अंधार? आकाश एवढं स्वच्छ की डोळे दिपावेत पण त्या सैनिकांचं दृश्य इतकं सावधानतेचं, काळजीचं की आपल्या गाफिलपणातही एवढा अंधार नाही. दर चार वाहानांमागे सीआरपीएफ, बीएसएफच्या जवानांची सामानासारखी ने आण करणाऱ्या जाळीबंद गाड्या, त्यातून उघड्या जीपमधून वर उभं राहावं असा एकच सैनिक कॅबिनच्या मधातून एकटाच उभा, तोही गोळी घालण्याच्या तयारीत, खरं तर तो निशाण्यावर त्याच्या निशाण्यावर कुणीच नाही. जीवापेक्षा स्वाभिमान मोठा असतो असं सांगणाऱ्यांचा तो भेसूर चेहरा.

मी परवा हैदर पाहायला. मधातच लकवा भरलेल्या माणसासारखे माझे स्नायू निर्जिव होतायत असं वाटत होतं, श्वास थांबण्याची भीती बाजुच्या खुर्चीवर येऊन बसलीय असं.हजारो वर्ष जुन्या असलेल्या शंकराचार्याच्या मंदीरात उभा राहीलो आणि अख्ख श्रीनगर पाहुन घेतलं, हे मंदीर म्हणजे श्रीनगरचं मध्य शिखर. ऐन शहराच्या मधातून वाहाणारी झेलमही दिसली पण हैदरच्या बाबाला ज्या रात्री झेलममध्ये फेकून दिलं ती ना रात्र अनुभवली, ना ते झेलमचं पाणी ज्यानं रूहदारच्या गोळ्यांनी चाळणी झालेल्या शरीरात जीव भरला. गुलमर्गच्या पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या पर्वतावर चढलो पण बारामुल्लातल्या त्या निनावी बर्फातल्या कबरीतलं मरण नाही अनुभवलं, सोनमार्गच्या त्या दगड गोठ्यांनी ओबडधोबड झालेल्या रस्त्यातून खेचरावर मांड टाकली पण तो रस्ता नाही सापडला ज्या रस्त्यावरून हैदर पुन्हा पुन्हा गायब होत राहातो. मीही दल लेकवर हळूच अवतरणारी पहाट अनुभवली, ते शांत, विस्तीर्ण, झबरवानच्या पायथ्यापर्यंत पसरलेलं पाणी पाहिलं पण आपलं घर बेचिराख झालेलं पहाताना हैदरच्या डोळ्यात जो समुद्र जमा होतो त्यातला थेंबही माझ्या डोळ्यात उतरला नाही.

वेगवेगळ्या लोकेशन्सवर दोन एकशे फोटोही काढले, कुठल्याच फ्रेममध्ये मी येणार नाही याची काळजी घेत पण त्यातल्या एकाही फोटोत भर दुपारी घरातून गायब झालेली तरणीबांड पोरं नाही सापडली. श्रीनगरच्या दोन एक चौकात कॉफी प्यायलो पण लाल चौकात जाऊन तो काश्मिरी कावा नाही प्यायलो जिथं हैदर सेक्शन ३७० च्या चिंधड्या करत असतो. शिकाऱ्यात मीही रात्र घालवली पण आमचा शिकारा कधीचाच किनारी लागलेला, तो ना डॉक्टरसाहबाच्या शोधात फिरला ना त्या रात्री अर्शीच्या कानातल्या झुमक्यात मला गुलमोहर जळताना दिसला. मी फिरण्यासाठी झोपत राहीलो आणि झोपण्यासाठी फिरत, हम थे है, की थे नही, बेशरम गुस्ताख चुस्पा.

ती अर्शीही हैदरलाच कशी भेटली कुणास ठाऊक? घराकडे वळलेल्या हैदरचा हात हातात घेऊन अब तुम्हारे घर में घर जैसा कुछ नही बचा है हैदर, म्हणणारी आणि त्याचं घर होऊ पाहाणारी अर्शी, आपल्या बापानं आपल्याला फसवलंय, त्या फसवणुकीतून हैदरचा जीव धोक्यात आलाय म्हटल्यानंतर हातात पिस्टल घेऊन, स्वत:ला जाळीत टाकणारी आणि वेड्यासारखी शरमंद आफताब अब क्या करू असं काश्मीरी भाषेत निर्विकारपणे रूदणारी अर्शी, बर्फाच्या कबरीतच शेवटी शांत होणारी अर्शी, मी अजुनही शोधतोय तिला, मला अर्शी नाही भेटत, भेटतात त्या गजाला, स्वत:चं सख्ख पोरगं वेड्या अवस्थेत असताना, तो तिच्या मानेवर पूर्ण पुरूष होऊन अत्तरचा थेंब टाकतो आणि तिलाही त्याच्या ओठांच्या स्पर्शानं काय जादू केलीय हे आरशात पहाण्याचा मोह न आवरता येणाऱ्या गजाला, स्वत:च्याच प्रतिबिंबात अडकलेली जहर खुबसुरत गजाला, रोशन बहारा युरवलो.

दिवस संपलेला आणि रात्र सुरु होण्याच्या काही क्षण अगोदर मीही जामिया मशिदीच्या समोरून गेलो पण त्या मशिदीसमोर मला हसन मीर नाही भेटला, आजादी तो वहाँ पर भी कोई काठीवालाही लाया था बंदुकवाला नही असं सांगणारा हसन मीर. मला बशीर पीरही नाही भेटला ज्याला स्वत:च्या घरात जाण्यापुर्वी चेकिंगची सवय लागलेली. मी ही माझ्या घरात जाण्यापुर्वी आता असाच थबकून उभा राहातो. मुंबईत ना कुणाचं घर असतं ना ते कुणाचं गाव. इथं सगळे पर्यटक. मी कधी हैदर, कधी खुर्रम, कधी रूहदार, कधी गजाला.

एकदा गुलजारसाबला पाच फुट अंतरावरून दिड एक तास फक्त ऐकत राहीलो. दोन सलमानचा खून जिथं हैदर करतो त्या पांढऱ्या शुभ्र गारठलेल्या बर्फासारखे कपडे घालणारे गुलजारसाब, पल भर मे सब कुछ बदल गया, और कुछ भी तो नही बदला, जो बदला ओ भी तो गुजर गया म्हणणारे गुलजारसाब, त्यांच्या बिस्मिल शब्दांनी हैदरची अस्वस्थता कित्येक जीवात पेरलीय. विशाल त्यांचं एक्सटेन्शन, तो भेटला तर त्याचा हात हातात घेईन म्हणतो, परत काश्मीरला जाईन म्हणतो पण यावेळेस बारामुल्लाच्या त्या निनावी कबरेत माझीही एक कबर मी शोधीन म्हणतो.

Mere ishq mein laakhon latke

This article is meant to be posted in atulsongaday.me. If this article appears in sites like lyricstrans.com and ibollywoodsongs.com etc then it is piracy of the copyright content of atulsongaday.me and is a punishable offence under the existing laws. 928 more words

Feelings Of Heart

Kill Dil - Music Review

Kill Dil as many of you would have wondered if it is a Hindi remake of Kill Bill, but it is not. It is a story of Bhaiyaji played by Govinda, who trains  Dev played by Ranveer Singh and Tutu played by Ali Zafar to be killers. 541 more words

Music Review

Haider: A short review

Haider: This movie has definitely captured the viewers imagination this season and with Bang Bang being released the same weekend, an apt yardstick has been thrown in. 504 more words

Bollywood

जब मैं छोटा था - गुलज़ार की पंक्तियाँ

जब मैं छोटा था,
शायद दुनिया
बहुत बड़ी हुआ करती थी..

मुझे याद है
मेरे घर से “स्कूल” तक का
वो रास्ता,

क्या क्या
नहीं था वहां,

Journey

piyushKAVIRAJ reblogged this on piyush kaviraj and commented:

Gulzar!

Follow Up: Munshi Premchand

Every child in India has read at least one short story by Premchand, either in school or in university. At our mehfil at Prithvi we decided to honour the legacy of Premchand through his rich literature. 389 more words

Urdu Mehfils

I'll make original films till my mind is functional, says Rajkumar Hirani

Filmmaker Rajkumar Hirani, known for Bollywood entertainers like Munna Bhai MBBS, Lage Raho Munna Bhai, has nothing against those who make remakes but says he will make original films till his mind is functioning well. 159 more words

Entertainment