Tags » Indian Breakfast

मुळ्याचा पराठा

मला स्वतःला पराठे फार आवडतात. मग ते सारण भरून केलेले असोत की साधे. एकदा दिल्लीला गेले असताना माझी मैत्रीण मैथिली हिच्या नातेवाईकांकडे खाल्लेल्या गोबी पराठ्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. अर्थात उत्तरेत मिळणा-या फ्लॉवर किंवा मुळ्याची चव काही वेगळीच असते. मला मुळ्याचा पराठाही फार आवडतो. मुळ्याचा पराठा सारण भरून केलेलाच छान लागतो. हा पराठा मी दोन पध्दतीनं करते. दोन्हीची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.

पहिली रेसिपी जी आहे ती माझी मैत्रीण मंगल केंकरे हिच्याकडून मी शिकले आहे.

मुळ्याचा पराठा:

साहित्य- दोन मोठे मुळे, एक कमी तिखट हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर, दीड टीस्पून धनेपूड, एक टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून आमचूर पूड ( आपल्या आवडीनुसार प्रमाण वाढवू शकता), चिमूटभर गरम मसाला, मीठ चवीनुसार, पराठा भाजण्यासाठी तेल/ तूप/ लोणी/ बटर आवडीनुसार, नेहमीसारखी पोळ्यांना भिजवतो तशी भिजवलेली कणीक

कृती:  

1) प्रथम मुळ्याची सालं काढून जाड किसणीनं मुळा किसून घ्या. एका स्वच्छ पांढ-या पंचावर मुळ्याचा किस पसरून ठेवा. साधारण पंधरा मिनिटांनी किस पंचातच घट्ट पिळून घ्या.

2) कोरडा झालेला किस एका भांड्यात घेऊन त्यात धनेपूड, तिखट, आमचूर, गरम मसाला, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची (कमी तिखट खात असाल तर मिरची घातली नाही तरी चालेल) आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सारण तयार करून घ्या.

3) आता कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्या. त्यावर हे सारण पसरून घ्या. दुसरी पोळी लाटून ती सारण पसरलेल्या पोळीवर ठेवा.

4) दोन्हीच्या कडा एकमेकांवर दाबून नीट बंद करून घ्या. पराठा हलक्या हाताने थोडासा आणखी लाटा.

5) गरम तव्यावर मध्यम आचेवर पराठा भाजा.

6) भाजताना आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप किंवा घरचं लोणी किंवा अमूल बटर लावून खमंग भाजा. मला स्वतःला तूप किंवा अमूल बटर लावून भाजलेला पराठा आवडतो.

गरम पराठा लोणचं, दही किंवा लोण्याबरोबर खा.

मुळ्याचा पराठा ( २ )

साहित्य – दोन मोठे मुळे, डाळीचं पीठ ३-४ टेबलस्पून, १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, १ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, नेहमीसारखी भिजवलेली कणीक, भाजण्यासाठी तेल/ तूप / लोणी /बटर आवडीनुसार

कृती:

1) प्रथम मुळ्याची सालं काढून किसून घ्या.

2) एका कढईत नेहमीसारखी फोडणी करा. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग आणि हळद घाला.

3) त्यात मुळ्याचा किस घालून एक वाफ येऊ द्या.

4) नंतर त्यात लाल तिखट, मीठ, दाण्याचा कूट, बेसन घालून चांगलं एकत्र करा. परत एक दणदणीत वाफ येऊ द्या.

5) गॅस बंद करा. सारण थंड करण्यासाठी बाजुला ठेवा.

6) नेहमीसारखा पोळीसाठी घेतो तसा कणकेचा उंडा घ्या. त्यात पुरण भरतो तसं लिंबाएवढं सारण भरा.

7) भरलेला गोळा हलक्या हातानं लाटून घ्या. आणि गरम तव्यावर मध्यम आचेवर पराठा भाजून घ्या. भाजताना आवडीप्रमाणे तेल/ तूप/ लोणी/ बटर वापरा.

गरम पराठा लोणचं, दही किंवा लोण्याबरोबर खा.

नाश्ता

Rajma (red kidney beans)

 

Red kidney beans (razma)

It is a famous north Indian cuisine which can be served as main course and eaten with rice and roti both. It is a common Delhi street food and is extremely tasty. 218 more words

Vegetarian

Oats Uthappam

Want a quick breakfast prepared? Uthappam is similar to pancake. Oats Uthappam is a very tasty and a healthy breakfast. This is quite heavy as well. 163 more words

Food

Celery Chutney

In my regular Tamil online magazine, there was an article with the recipe of Celery chutney. I got intrigued by the recipe , an Indian version of Celery that looked too good. 178 more words

Food

Aloo k parathe

India’s favorite breakfast, this vegetarian dish is very popular in North India. Made in desi ghee, it is packed with high calories and keeps you full for a long time. 176 more words

Vegetarian

Pesarattu Dosa/ Moong Bean crepes

Pesarattu is a very healthy crepes prepared in south Indian breakfast. This is a very simple recipe at the same time very healthy. Being a south Indian, Idli and Dosa is something that we love. 263 more words

Food

Tapioca Pearl Kichadi/ Javvarisi upma

Tapioca pearl is called Sabudhana in India.Also called Javvarisi in Tamil. Sabudhana kichadi is a very tasty recipe. Usually prepared during vrat/pooja. It has more carbohydrates which is why to get the carbs needed this is used during vrat. 269 more words

Food