फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार
माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार
घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार
तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार
गोष्टी घराकडिल
गोष्टी घराकडिल मी वदता गड्या रे
झाले पहा कितिक हे विपरीत सारे!
आहे घरासचि असे गमते मनास
ह्या येथल्या सकल वस्तु उगीच भास! १
ही देख म्हैस पडवीमधि बांधलेली
रोमंथभाग हळु चावित बैसलेली
मित्रा! गजामधुनि या पडवीचिया रे
मौजा पहा क्षणभरी रजनीचिय रे!- २
डोळ्यात बोट जरि घालुनि पाहशील
अंधार तो अधिकचि तुजला दिसेल!
अंधार जो फलक होतसे अम्हास
चेतोनिबद्धजनचित्र लिहावयास!३
आवाज किर्र रजनी वदतेच आहे
घों घों असा पवन नादहि बोलताहे
ऐके पलिकडूनि बेडुक शेतभाती
पर्जन्यसूक्त सगळे मनसोक्त गाती! ४
ही चारपाच चढुनी हळु पायठाणे
या ओसरीवर अता जपुनीच येणे!
हे ऐक रे टकटका करिते घड्याळ
या शांततेत गमते कुटतेच टाळ! ५
डावीस हा बघ निराखुनी एक माचा
निद्रिस्त त्यावरि पिता अतिपूज्य माझा
त्याचा खरोखर नमी क्षणपुत्र शोभे
तो सर्वदा जरी म्हणे मज पुत्र लोभे! ६
तातास या बघुनि या हृदयास खाते
होऊन हे हृदय विव्हल सर्व जाते!
त्याच्या तरी पदयुगावरिया पडूनी
न्हाणू तयास मग का वद आसवांनी? ७
ताताचिया बघ गड्या उजव्या कडेला
बापू असे तिथ बरे अमुचा निजेला
अज्ञान तो चपलधी परि बाळ आहे
त्याचे विशी मम मनी अतिलोभ राहे! ८
बापू गड्या ध्वज उभा करशील काय?
तू देशकारण करू झटशील काय?
बापू जनात दिवटी धरशील काय?
स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय? ९
मित्रा! धरी सुदृढ हस्त मदीय फ़ार
दारास आडसर घट्ट असेल थोर
दाराचिया तर फटीतुन आत जाऊ
सानंद सुस्थित घरांतिल सर्व गाऊ! १०
मित्रा इथे कितितरी मज हर्ष होई
येथे हवा मधुर निश्वसनास येई
नाही कधी हि बुधवारवनात जैशी
वाटेवरी चतरशिंगिचिया न तैशी! ११
मित्रा असा हळुच ये उजवेकडेस
खोली पहा पघळ ही किती ऐसपैस;
निद्रावशस्वजन येथ बघूनियास
हर्षाचिया न उकळ्या फुटती कुणास? १२
ती एक खाट समोर अवलोक आता
आहे सुषुप्तिवश तेथ मदीय माता
तीचे कुशीत निजली दिसते मदीय
भीमा स्वसा, बघुनी ती मज हर्ष होय. १३
मत्कारणे स्तवुनी देव, निजावयाते
आलीस तू खचित गे असशील माते!
मोठे त्वदीय उपकार जरा तरी ते
जातील का फिटुनिया तवपुत्रहस्ते? १४
खाली मदीय भगिनी दिसती निजेल्या
गोष्टी जयास कथिता न पु-याच झाल्या!
ती कोण दिसते? -निजली असुनी
जी श्वास टाकित असे अधुनी मधूनी! १५
कान्ताच ही मम! अहा! सखये मदीय
स्वप्ने अता तुज गडे दिसतात काय?
आता असो,! पण पुढे तुजला दिसेन
स्वप्ने तुझी मग समग्र तुल पुसेन! १६
मागील दारि सखया! तुळशीस आता
वन्दू, जिला ममजनी नमिला स्वमाथा!
सोडूनि गांव वळणे अमुच्या घराचे,
येऊ घरा परत खासगिवालियाचे! १७
- केशवशुत
जे उरात उरते
जो गंध फुलांतून झरतो,
वा-याच्या उरी उतरतो;
होउन लेखणी वारा,
मग भवतालावर लिहितो.
जी वाफ जलाची होते,
ती मनी नभाच्या शिरते,
बेधुंद सरींनी गाणे
धरतीवर उपडे होते.
नभ वा-याचेच असे हे
औदार्य असावे थोर
नि:संग किती घेताना,
देताना नसतो घोर.
मी भरून घेतो सारे
हृदयाच्या काठोकाठ,
शब्दांतून देताना का
पाझरता होतो माठ?
शब्दांतून देऊन सुध्दा
जी उरात उरते काही;
ती प्रेरक शक्ती मजला
जगण्याची देते ग्वाही.
- शेख गुरूजी
गाऊ त्यांना आरती
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाऊ त्यांना आरती
कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाऊ त्यांना आरती
स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती
आप्तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाऊ त्यांना आरती
देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाऊ त्यांना आरती
देह जावो, देह राहो; नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाऊ त्यांना आरती
जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाऊ त्यांना आरती
नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृती, गा तयांची आरती."
- यशवंत
जन पळभर
जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’
जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’
मी जाता राहिल कार्य काय?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय?
मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय?
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचे काय जाय?
रामकृष्णही आले, गेले
त्यांविण जग का ओसचि पडले?
कुणी सदोदित सूतक धरिले?
मग काय अटकले मजशिवाय?
अशा जगास्तव काय कुढावे?
मोहि कुणाच्या कां गुंतावे?
हरिदूता कां विन्मुख व्हावे?
कां जिरवुं नये शांतीत काय?
भा. रा. तांबे
बघ आई आकाशात सूर्य हा आला।
पांघरून अंगावर भरजरी शेल॥
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी।
मोतियाच्या लावलेल्या त्यात झालरी॥
केशराचे घातलेले सडे भूवरी।
त्यावरून येई याची डौलाने स्वारी॥
डोंगराच्या आडून हा डोकावी हळू।
आणि फुले गुलाबाची लागे उधळ॥
मंद वारा जागवितो सा-या जगाला।
म्हणतसे उठा उठा मित्र हा आला॥
नभातून सोनियाच्या ओती तो राशी
गुदगुल्या करी कशा कळ्या फुलांसी
पाखरांच्या संगे याची सोबत छान
गाती बघ कशी याला गोड गायन
मंद वारा जागवीतो सार्‍या जगाला
म्हणतसे ऊठा ऊठा मित्र हा आला
या कवितेचा कवी माहित नाही. कोणाला महित असल्यास सांगावे.
डराव डराव!
डराव डराव! डराव डराव!
का ओरडता उगाच राव?
पत्ता तुमचा नव्ह्ता काल
कोठुनी आला? सांगा नाव
धो धो पाउस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!
बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव
जा गाठा जा अपुला गाव
आणि थांबवा डराव डराव!
- ग. ह. पाटिल
लाला टांगेवाला
लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला
कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला
टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला
लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला
झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला
- नारायण गोविंद शुक्ल
जशी ती
तो कधी येईल, कधी न येईल
कधी भेटेल, कधी न भेटेल
कधी लिहिल, कधी न लिहिल
कधी आठवण काढील, कधी न काढील
असा तो. एक अनिश्चिती…………..
बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी.
म्रूत्युसारखी.
त्या अनिश्चितीच्या ताणांच्या धाग्यात
तिचे पाय गुंतणार, काचणार……..
कोलमडणार….
पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक
पीळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर
उभी राहून ती झोके घेऊ लागली
या अस्मानापासुन त्या अस्मानापर्यंत
अशी ती एक मूक्ता
वार्यासारखी. जीवनासारखी.-
“इंदिरा संत
फुलात न्हाली पहाट ओली
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलाविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!
- ना. धों. महानोर
आभाळाची आम्ही लेकरे
आभाळाची आम्ही लेकरे,
काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा
धर्म वेगळा नाही
श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकर्‍यांची आमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा
गाव वेगळा नाही
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
कर्म वेगळे नाही आम्हा
मार्ग वेगळा नाही
माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच आमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा
संत वेगळा नाही
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
श्वास वेगळा नाही आम्हा
ध्यास वेगळा नाही
- वसंत बापट
जिकडेतिकडे पाणीच पाणी
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे,
झुळझुळणारे गवत पोपटी
लवलवणारे तुरे.
नवी लकाकी झाडांवरती
सुखात पाने-फुले नाहती,
पाऊसवारा झेलित जाती
भिरभिरती पाखरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.
हासत भिजती निळसर डोंगर
उडया त्यांतुनी घेती निर्झर,
कडेकपारी रानोरानी
नाद नाचरा भरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.
मधेच घेता वारा उसळी,
जरी ढगांची तुटे साखळी,
हिरव्या रानी ऊन बागडे
हरिणापरी गोजिरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.
- शंकर वैद्य
परमेश्वराची प्रार्थना
आस ही तुझी फार लागली!!
दे दयानिधे बुद्धि चांगली!!
देवूं तूं नको दुष्ट वासना!!
तूंच आवरीं माझिया मन!!१!!
देह देउनी तूंच रक्षिसी!!
अन्न देउनी तूंच पोशिशी!!
बुद्धि देउनी काम सांगशी!!
द्नयान देउनी तूंच तारिशी!!२!!
वागवावया सर्व सृष्टिला!!
शक्ति बा असे एक तूजला!!
सर्वशक्ति तूं सर्वदेखना!!
कोण जाणिजे तुझिया गुणा!!३!!
नाम रूप हें तूजला नसे!!
तय तुला मुखें वर्णावे कसें!!
आदि अंत ना मध्य ही तुला!!
तूंच दाविशी मार्ग आपुला!!४!!
माणसे आम्ही सर्व लेकरें!!
माय बाप तूं हें असे खरें!!
तुझिया कृपेवीण इश्वरा!!
आसरा आम्हा नाहीं दूसरा!!५!!
तूंच आहासी आमची गती!!
देईं आमुतें उत्तमा मती!!
प्रर्थितों तुला जोडुनी करां!!
हे दयानिधे कीं कृपा करा!!६!!
[श्लोक : कामदाछंद]
थोर तुझे उपकार
थोर तुझे उपकार !!
आई, थोर तुझे उपकार !! ध्रु०!!
वदत विनोदें हांसत सोडी !!
कोण दुधाची धार !!१!!
नीज न आली तर गीत म्हने !!
प्रेम जिचे अनिवार !!२!!
येई दुखने तेव्हा मजला!!
कोण करी उपचार!!३!!
कोण कड़ेवर घेऊन फिरवी!!
चित्ती लोभ अपार!!४!!
बाळक दुर्बळ होतों तेव्हा!!
रक्षण केले फार!!५!!
त्वांची शिकाविले वाढविले त्वां!!
आहे मजवर भार!!६!!
स्मरण तुझ्या या दृढ़ ममतेचें!!
होंते वारंवार!!७!!
नित्य करावे साह्य तुला मीं!!
हा माझा अधिकार!!८!!
भास्कर दामोदर पालंदे.
माझा गाव
निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !
पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.
माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या फणसाचे झाड.
असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे.
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.
थोडया पायवाटा हिंडा
लालतांबडया वाकडया.
होडया उपडया झालेल्या
तशा बघाल टेकडया.
जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले.
गोव्यतला माझा गाव
असा ओव्यांतच गावा.
तेथे जावून राहून
डोळे भरून पाहावा.
- बा. भ. बोरकर
प्रेमाचा गुलकंद
बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी ‘त्या’ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित ‘तिज’ला नियमाने!
कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!
गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!
प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!
कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!
या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगत करी मग मनातले बोल!
अशा तर्हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!
अखेर थकला! ढळली त्याचि प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!
धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, ‘देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)
‘बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तांचे काज?
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?’
तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, ‘आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी’
असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!
म्हणे, ‘पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!
कशास डोळे असे फिरविता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!’
क्षणैक दिसले तारांगण त्या,-परि शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!
‘प्रेमापायी भरला’ बोले, ‘भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?’
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रदय थांबुनी कधीच नातरि तो असता ‘खपला’!
तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
‘प्रेमाचा गुलकंद’ तयांनी चाटुनि हा बघणे!
प्र. के. अत्रे
माझ्या गोव्याच्या भूमीत
माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||
माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फळान्चे पाझर
कळी फ़ुलांचे सुवास||
माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||
माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||
माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||
माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||
माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||
माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||
- बा. भ. बोरकर
आमची मांजरी
[शार्दूलविक्रीडित]
शोभे वर्तुल तोंड गोंडस जिचें, नासाप्रभा तांबडी
डोळे नीलविलोल गोल दिसती प्रत्यक्ष पाचू खडी;
जीचे छान लहान कान गमती गोकर्णिकेचीं फुलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! १ !!
भाटी हे, परि नीट लांब फुटती ओठीं मिशा पांढर्‍या;
अंगी लोंकर फार ती मृदु उशी ही सांवरीची खर्‍या,
कोठें लाल, मधून शुभ्र ठिपके देहीं जिच्या शोभले,
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! २ !!
वाटे शेंपुट लांब फार मृदुसें रेशीम-गोफापरी;
रागानें परि त्यास जी फुगवितां येते ब्रशाची सरी,
जातां धांवतही कधींहि न जिचीं तीं वाजती पावलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! ३ !!
पंजे शुभ्र जिचे असून वरतीं काळीं नखे भासती
जेवीं पूर्ण-शशांक-बिंबि दिसती ते डाग रम्याकृती,
पट्टा चंदन-शुभ्र गंध जणुं हें भाळीं असे रेखिले
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! ४ !!
आणी दूध जधीं सकाळिं गवळी, येई तधीं धावुनी,
त्याचे भोंवती नाचुनी शिरुनियां पायीं तनू घासुनी
‘म्यां म्यां’ ओरडुनी सुखें पय पिई जें भूवरी सांडलें
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! ५ !!
येतां अंबररत्नबिंब उदया जाऊन कौलांवरी,
घेवोनी नवमित्ररश्मि अपुल्या देहीं,सुखातें वरी,
तेथें निर्मल सर्व अंग करिते जी चाटुनी आपुलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! ६ !!
नेमें साधुनि भोजनावसर ही बैसोनि पानापुढे
राही स्वस्थ भली उगाच न पळे पंक्तींत चोहोंकडे,
घालूं भूवर भात खात तितका, चित्राहुती ना गिळे
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! ७ !!
खोडी एक परंतु होय तिजला, सोडी न तीते जरा,
नाहीं तूप, न भात खात अगदीं कांहिंहि तुम्ही करा;
हुंगोनी नुसतेंच अन्न बसती राही उपाशी बळें
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! ८ !!
होतां भोजन अंगणीं मग तनू टाकूनियां आडवी
डोळे झांकुन, शांत निश्र्चल मनें चारी पदां लांबवी
साधूनी स्वसमाधि साधुस असे मागें जिनें टाकिलें
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! ९ !!
ऐशी घेउनियां जरा सुखकरा जी नित्य विश्रांतिला
डोळ्यांतें उघडी, पदांस अखडी, सोडीच भूमीतला
देई जांभइ जी उठूनि तनुला देवोनि आळेपिळे
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !!10!!
पाहोनी मग अंगणांत चिमणी घाली झणीं झांपडी
जातां ती उडुनी हताश बनुनी बैसे धरोनी दडी
लावी निश्र्चल अंगणीं टक, जिचें क्रोधें मन क्षोभलें
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! ११ !!
येंता ती चिमणी पुन्हां उचलुनी जी मागले पाय ते
घेई भार पदीं पुढील, सहसा वेगें उडी मारते,
जातां भक्ष्य परी भरारुनि, जिचें हो तोंड ओशाळलें
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! १२ !!
केव्हा पुच्छ धरी पुढील चरणीं चावी स्वदंतांकुरें
येतांची कळ तें त्यजी गरगरां नाचे, स्फुरे, गुर्गुरे;
भुमीते खरडी स्वकीय नखरीं मध्येंच जोरें पळे,
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! १३ !!
राहेना पळही कधीं चपळ जी एके स्थळीं सुस्थिर,
धांवे धूम, उडे, मधेंच उसळे; धुंडीत सारें घर,
चाळे दाखविते अनेक, धरिती पाठीस जेव्हां मुलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! १४ !!
कांहीं खुड्खुड्लें, तरी धडपडे, नाचे पडे बागडे,
कोठें आड दडे, मधें वर उडे, घे धांव चोहोंकडे,
जी झाडावर वेंधतां खग-कुळें होती भय-व्याकुळें;
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! १५ !!
रात्रीं जी न मनी जुमानित तमा धैर्यें फिरे मंदिरीं,
टेहाळी करि, संधि साधुनि उडी टाकावया उंदिरीं;
या कृत्यें ज्वर-राज-मानसिं जणूं शल्यापरी जी सले !
ऐशी सुंदर मांजरी बघुनिया मच्चित्त हें लोभलें !! १६ !!
बाळकृष्ण अनंत भिडे
आला क्षण!
गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो; पण
गंभीरपणे घड्याळ बोले-
‘आला क्षण-गेला क्षण!’
घड्याळास या घाई नाही,
विसावाही तो नाही; पण
त्याचे म्हणणे ध्यानी घेई-
‘आला क्षण-गेला क्षण!’
कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमीत व्हावयास मन,
घड्याळ बोले अपुल्या वाचे-
‘आला क्षण-गेला क्षण!’
कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणित घण,
काळ-ऐक! गातो अपुल्याशी-
‘आला क्षण-गेला क्षण!’
लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करिती-
‘आला क्षण-गेला क्षण!’
कवी – केशवसुत
मामाची गाडी
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो
कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो
शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो
कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो
- ग. ह. पाटील
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा
भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर
मंगेश पाडगांवकर
उघड उघड पाकळी
उघड उघड पाकळी, फुला रे
उघड उघड पाकळी
आंतल्या आंत कोवळे
मधुजीवन कां कोंडले?
बाहेर हवा मोकळी, फुला रे
तमसंकुल सरली निशा
नीलारुण हंसली उषा:
चौफेर विभा फांकली, फुला रे
मलयानिल उदयांतला
बघ शोधत फिरतो तुला
कां मृदुल तनू झांकली, फुला रे
कीं रहस्य हृदयांतले
आंतल्या आंत ठेवलें?
ही तुझी कल्पना खुळी, फुला रे
- ना. घ. देशपांडे
हिरकणी
गोपनारी हिरकणी गडा गेली
दूध घालाया परत झणी निघाली
पायथ्याशी ते वसे तीचे गाव
घरी जाया मन घेई पार धाव||ध्रु||
शिवप्रभुंचा निर्बंध एक होता
तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता
सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे
कुठे कोणा जाऊ-न-येऊ द्यावे||१||
सर्व दरवाजे फिरून परत आली
तिला भेटे ना तेथ कुणी वाली
कोण पजील तरी तन्हुल्यास आता
विचारे या बहुदु:ख होय चित्ता||२||
मार्ग सुचला आनंद फार झाला
निघे वेगे मग घरी जावयाला
नसे रक्षक ठेविला जेथ ऐसा
तेथ होता पथ रायागादी खासा||३||
गडा तुटलेला कडा उंच नीट
घरी जाया उतरली पायवाट
पाय चुकता नेमका मृत्यु येई
परी माता टी तेथुनीच जाई||४||
उतारू लगे मन घरी वेधलेले
शुद्ध नाही जरी तनुस लागलेले
अंग खराचाताले वस्त्र फतालेले
आशा वेशे ती घरा प्रति चाले||५||
वृत घडले शिवभूप कर्णि जाता
वदे आनंदे धन्य धन्य माता
काड्या वरती त्या बुरुज बंधियेला
नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला||६||
कवी मला नक्की माहीत नाहीत…….
आईपणाची भीती
आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती
अगतिकतेची असली खंत मनात कधीच दाटली नव्हती.
विचारलेस आज मला"आई कोणती वाट धरू?"
गोळा झाले कंठी प्राण आणि डोळे लागले झरू.
कोणती दिशा दाखवू मी तुला? पूर्व? पश्चिम्? दक्षिण? उत्तर?
माझ्यासारख्याच भीतीने या चारी दिशा झाल्या फ़त्तर.
कोठे ज्ञान, यश, सुख? काय त्यांच्या खाणाखुणा?
या-त्या रुपात दिसतो सैतानच वावरताना.
जळी, स्थळी, आकाशीही अणूबॉम्ब झाकला आहे
प्रत्येक रस्ता माणसाच्या रक्ताने रे माखला आहे.
आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा
द्रौणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा.
कोठेतरी गेलेच पाहिजे गतीचीही आहेच सक्ती
जायचे कसे त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती.
खचू नको, शोध बाळा तुझा तूच ज्ञानमार्ग
कोणतीही दिशा घे पण माणुसकीला जाग.
धीर धर, उचल पाय, आता मात्र कर घाई
आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई.
- पद्मा गोळे