Tags » Marathi

लाच !!

 

बहुदा, लाच देऊनच त्याच्याकडून काम करून घ्याव लागेलं ।

मंदिरा बाहेरचा भिकारी अजूनही उपाशीच आहे ।।

 

सरळ मार्गाने सगळंच तर केलं ।

दान दिलं, दक्षिणा दिल्या,

सोनं नाणं चढवलं,

ओटी भरली, उपवास केले,

तारखा-वार-तिथी जपून वेळेवर अभिषेक केले,

तुपाचा नएवेध्य चढवला,

पोतीभर नारळं फोडली,

मेणबत्त्या लावल्या,

बोकड कापली …

परंपरा सांभाळत सगळचं तर करत आलो आणि केलं,

अगदी सरळ मार्गाने ।।

पण, देऊळा बाहेरचा भिकारी तो अजूनही उपाशी आणि दारिद्रयातच ।।

 

बहुदा, लाच देऊनच त्याच्याकडून काम करून घ्याव लागेल ।।

 

 

 

Marathi

आपण मुलांना मदत करत आहोत?

पुस्तकात सोडवून दाखविलेल्या उदाहरणांसारखीच गणितं अभ्यास म्हणून किंवा परीक्षेत येतात. त्यात आकडे सोडून काहीच बदल नसतो. समजा, पुस्तकाच्या बाहेरचं गणित असेल, तर त्यात टीप असते. उदाहरणार्थ –

एका सायकलने 3किमी प्रवास केला. जर त्या सायकलच्या चाकाची त्रिज्या 21सेंमी असेल तर 3किमी अंतर कापताना चाकाच्या किती फेऱ्या होतील?

टीप :-  चाकाच्या फेऱ्या = सायकलने कापलेले अंतर / चाकाचा परीघ

वेगळं गणित आलंच, तर त्यात अशी टीप का लिहिलेली असते? त्याहीपुढे जाऊन विचारावंसं वाटतं, की गणितामध्ये मुलांनी नक्की काय शिकणं अपेक्षित आहे? मला वाटतं, की गणितं सोडविताना नुसती त्या गणितांची उत्तरं काढणंच नाही, तर एकूणच प्रश्न सोडविण्याचं कौशल्य शिकणं अपेक्षित आहे. प्रश्नांची उत्तरं स्वत:ची स्वत: विचार करून शोधायला शिकणं हा गणित शिकण्याचा मूळ हेतू आहे. आजकालच्या जगात वेगवेगळ्या गोष्टी माहीत असण्याचं महत्त्व पूर्वीइतकं उरलेलं नाही. माहिती तर काय सहज इंटरनेटवर शोधता येते. पण मिळालेल्या माहितीचा वापर करता येणं आणि योग्य तो वापर करून प्रश्न सोडविता येणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. माहिती कुठे आणि कशी वापरायची हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

आपली मुलं झपाट्याने बदलणाऱ्या जगात मोठी होत आहेत. आज आपण कल्पना करू शकणार नाही, अशा नव्याच समस्या, नव्या प्रश्नांना भविष्यात त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आपण त्यासाठी त्यांना तयार करायला हवं. गणिताचे अभ्यासक्रम आणि उदाहरणं शक्य तितकी सोपी (म्हणजे डोकं न वापरता सोडविण्याची) करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे. अशाने मुलं स्वतंत्र विचार करायला, प्रश्न हाताळायला कशी शिकणार? आणि खोच असलेलं, आव्हानात्मक गणित सोडविण्यातला आनंद वगैरे विचार तर फारच दूर राहिला!

वरच्या उदाहरणातली ‘टीप’ ही मुलांना गणित सोडवायला मदत करण्यासाठी असते. पण दूरगामी विचार केला, तर याने मदत होते आहे की नुकसान?

शिक्षण

प्रेम म्हणजे ... ...?

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी   जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.

पगार कितीही कमी असेल तरी दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको … 
म्हणजे प्रेम!

कुणाचा  रिप्लाय येवो अगर न येवो, तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम….

©Kuna!..

मराठी कविता

Lai Bhaari

Lai Bhaari is Riteish’s debut into Marathi movies as an actor.  If you have seen Marathi movies, there has been a drastic change in the demographic of the audience the movies target over the last couple years.  338 more words

Salman Khan

Indian PM Modi Stresses Formula of Growth and Development as Key to Future

Prime Minister Narendra Modi greeted the Indian nation in 18 Indian languages on the occasion of India’s 68th Independence Day, and assured that no stone would be left unturned to fulfill the mandate given by the people. 377 more words

India

न विरघळलेली साखर

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता …
अवती भोवती पाहता हळूच
चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते,
अरेच्या! साखरच घालायला विसरलो कि काय…

पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले
तुम्ही कसाबसा तो कडू
चहा संपवता आणि नजरेस
पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न
विरघळलेली साखर….

आयुष्य असच असतं…
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे…

Marathi