Tags » Polling Booth

३१२) निवडणूक

३१२) निवडणूक

निवडणूक आली आणि गेली !!!!
दर एक – दोन वर्षांनी कोणतीतरी निवडणूक येते आणि जाते….

प्रचाराचा – आरोप – प्रत्यारोपाचा धुरळा मात्र उडवते ……
आणि मतदाराला श्वसनाचा विकार देऊन जाते. :(
आश्वासनांची खैरात करते~~~~
पण गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरूनच जाते.

कधीतरी राजकारणात वादळ येते — कधी पाऊस पाडते तर कधी दुष्काळ . :(
निवडणुकीच्या काळात सामान्य माणसांची करमणूक होते…
जाहिरातदार, Media , इतर सेवा देणारे, सामान्य कार्यकर्ता यांना पैसा देऊन जाते.

पेरले कि उगवते.
निवडणुकीत केलेला खर्च चांगला परतावा देते.

निवडणुकीत कोणी हरतो – कोणी जिंकतो ….
पण निवडणुकीत हरुन सुद्धा विजयाचा आनंद घेता येतो …
कारण तुमच्या हरण्याने तुमचा शत्रू पण हरलेला असतो.
जिंकणारा परत हरणाऱ्या उमेदवाराशी हात मिळवणी करतो.
निकाल लागतो …. उमेदवारांचा आणि मतदारांच्या अपेक्षांचा.

काळ कोणासाठी थांबत नाही !!!
बघता बघता सरकारचा कार्यकाळ संपतो.
मतदानाचा हक्क मिळालेल्या पहिल्या निवडणुकीतील काही आश्वासने
म्हातारपणा पर्यंत अपूर्ण राहतात ….

कारण नेत्यांना माहित असते कि मतदारांची आठवण कमजोर आहे.
परिस्थिती बदलेल ह्या आशेवर आला दिवस ढकलत राहायचे
कालची परिस्थिती बरी होती म्हणत मनाला उभारी आणायची
आणि उद्याची परिस्थिती ह्याहून वाईट होऊ नये म्हणून काळजी करायची.

:) :)

सुधीर वैद्य

२६-०४-२०१४

Spandane Articles

३११) २४-०४-२०१४ - मतदान

३११) २४-०४-२०१४ – मतदान

आज सकाळी (२४-०४-२०१४) फिरून येताना नेहमी प्रमाणे मतदान करून आलो. मतदान केंद्रावर माझा पहिला नंबर लागला आणि माझ्या पासून मतदारांची रांग सुरु झाली. :) नेहमी दुसरा नंबर लागतो. :) पण आज नातू आल्यामुळे पत्नीने मी मतदान करून घरी गेल्यानंतर मतदान केले. आमच्या केंद्रावर ९५ ते १०० % मतदान होते असा अनुभव आहे, त्यामुळे दिवसभर रांग संपत नाही.

ह्यानंतर मला मतदान करावे लागू नये अशी देवाकडे प्रार्थना आहे. मला मतदानाचा अधिकार वयाच्या २१ व्या वर्षी मिळाला. त्यावेळी मी CA चा अभ्यास करत होतो .

लोकसभेसाठी १९७७ साली मी प्रथम मतदान केले. सुरवातीच्या काळात नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा अशी निवडणूक एकाच वेळी -एकाच दिवशी होत असे. तसे एकदम मतदान करण्याचा मी अनुभव घेतला आहे. गेले ते दिवस. आता सुरक्षेच्या कारणामुळे संपूर्ण राज्यात एका दिवशी मतदान घेणे अशक्य झाले आहे.

लोकशाही हा शब्द ऐकला कि कॉलेजच्या पहिल्या दिवशी प्राध्यापकाने सांगितलेली व्याख्या आठवते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६६ वर्षांनी सुद्धा ती कशी बरोबर आहे ह्याची प्रचीती येते. अर्थात त्या व्याखेत मी एक अर्थपूर्ण बदल केला आहे. पण जाऊदे तो विषय. आज नको — परत कधीतरी.

मित्रानो, तुम्ही मतदान केले कि नाही ?

आजचा दिवस सर्वाना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

सुधीर वैद्य

२४-०४-२०१४

Spandane Articles