नागपूर – मुख्यमंत्र्यांच्या घरापासून २०० मीटरवर  ऑडी कंपनीच्या गाडीवर गोळीबार झाला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सगीर अहमद सिद्दिकी (२८) याच्या डोक्यात गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. सगीर सिद्दिकी हा घुग्गुस येथील रहिवासी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कोळसा खाणींमध्ये त्याच्या गाड्या चालतात.

ट्रान्सपोर्टच्या आडून तो कोळशाचा काळाबाजार करीत असून, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हेही दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील एका ‘वेकोली’च्या अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकीही दिली होती.  गुंड अबू याच्या टोळीशी त्याची जवळीक होती. कोळशाच्या काळ्याबाजारावरून अबू आणि सगीर यांच्यात वितुष्ट आले.  मंगळवारी दुपारी सगीर हा तीन मित्रांसह ऑडी कारने धरमपेठ परिसरातील कॉफी हाऊस चौकात आला होता. याच परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला आहे. सगीर व इतर दीडच्या सुमारास कारमध्ये बसून निघाले. काही अंतरावर त्यांची कार अ‍ॅड. साहिल भांगडे यांच्या कार्यालयाला धडकली. धडकेने  भिंत कोसळली आणि अ‍ॅड. साहिल कार्यालयाबाहेर आले. त्या वेळी

ऑडीमधून तिघे बाहेर पडले आणि त्यांनी रक्तबंबाळ सगीरला बाहेर काढले व रुग्णालयात नेेले. पोलिसांनी सगीरच्या सोबत असलेला झाकीर खान, शकील मनपिया आणि आशिष तारवते या तिघांना ताब्यात घेतले आहे. Read More…