Tags » 12th Grade

12th Grade: The Battleground of Democratic Ideas

Greetings,

This year we have examined how democracies function across time and space.  What do they do well?  What challenges put great stress upon them?  Are their paths that democracies generally take that they should always avoid?   1,012 more words

Weekend Updates

फिल्ममेकिंग 101: जादुई दुनियेची पडद्यामागची सफर 

Feature image credit: Ashwin Iyengar

जनसंज्ञापन आणि पत्रकारीता विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना चित्रपट बनवण्यामागची पद्धत, तंत्र, त्यामागचं कौशल्य इ.घटकांची ओळख व्हावी या हेतूने ‘फिल्ममेकिंग 101’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या चर्चासत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ‘बारायण’ या चित्रपटामधील कलाकार नंदू माधव, संजय मोने, अनुराग वरळीकर, प्रतीक्षा लोणकर तसेच दिग्दर्शक दिपक पाटील, छायाचित्रणकार मर्झी पगडीवाला आणि चित्रपटाच्या निर्माती आणि प्राध्यापिका  दैवता पाटील यांनी सहभाग घेतला होता.

चर्चासत्राच्या  सुरुवातीला चित्रपटातले कलाकार नंदू माधव, संजय मोने, अनुराग वरळीकर यांनी बारायण मधील स्वतःच्या व्यक्तिरेखांची ओळख करुन दिली. त्यानंतर मर्झी पगडीवाला यांनी गाण्यांची सिनेमेटोग्राफी करताना वापरलेल्या लाईट्स मागच्या तंत्राची ओळख उपस्थितांना सांगितली.

यावेळी बोलताना स्वतःची भूमिका विकसित करण्याबद्दल अभिनेते नंदू माधव यांनी मार्गदर्शन केले. “पहिल्यांदा प्रेक्षकांच्या दृष्टीने विचार करुन नंतर एक कलाकार म्हणून मी त्यातले बारकावे शोधून काढतो”, असं यावेळी ते म्हणाले.

फिल्म-मेकिंगचा  विद्यार्थी असल्याने अनुराग वरळीकरने सुद्धा आपल्या मनातील प्रश्न मोकळेपणाने विचारले. एखादी संकल्पना ते त्याची पूर्ण लांबीची एक कथा हा प्रवास कसा असतो असं विचारल्यानंतर दिपक पाटील यांनी हा प्रवास उलगडून सांगितला. जेव्हा आपण एक संकल्पना किंवा कथा लिहायला घेतो तेव्हा ती इतरांना सांगणं गरजेचं असतं तसेच चित्रपटाची कथा लिहीताना प्रेक्षकांचा विचार करावा लागतो असं पाटील यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना चित्रपटात दिग्दर्शकाचं महत्व प्रमाण मानलं जातं. लेखक,दिग्दर्शक आणि डी.ओ.पी.या तिघांच्या एकत्रित संयोगातून चित्रपट बनत असतो असं संजय मोने यांनी सांगितलं एकट्याने लिहील्यावर त्याची फक्त कथा तयार होते. तसेच लेखक आणि चार लोकांनी काहीतरी सेट केलं तेव्हा त्याचं नाटक बनतं. अशाप्रकारे ही माध्यमं आणि त्यांचं वेगळेपण अधोरेखित होत असतं असं मोने म्हणाले.

नाटक आणि चित्रपटामध्ये लेखक आणि अभिनयाच्या दृष्टीकोनातून काय फरक आहे या प्रश्नाबाबत बोलताना संजय मोने म्हणाले की, ‘’मी चांगलं लिहितो म्हणजे माझं हस्ताक्षर चांगलं आहे’’, व्यावसायिक दृष्ट्या चित्रपट हा लेखकांसाठी फायदेशीर असतो. नाटकात पैसे कमी मिळतात. नाटकात भूमिका पटकन मिळते परंतु चित्रपटासाठी भूमिका ही मिळवावी लागते. नाटक करताना आपल्याला अभिनयाबद्दल समोरुन त्वरित प्रतिक्रिया मिळत असते.

चित्रपटासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागते. रंगमंचावर आपण लाईव्ह अभिनय करत असतो. परंतु चित्रपटात आपण जेवढं काम केलंय ते एडिट होऊन प्रेक्षकांसमोर येत असतं. हा फरक लक्षात घेण्यासारखा असल्याचे मोने म्हणाले. यावेळी चित्रपटांच्या सबटायटल विषयी चर्चा झाली. त्यात मराठी शब्दांना इंग्रजीमध्ये तेवढे शब्द नाहीत. त्यामुळे खूपवेळेस मराठी सबटायटल करताना त्यात काहीतरी राहतं. कारण खूपवेळेस शब्दशः भाषांतर होताना आपल्याला दिसतं, असं मत पाहुण्यांनी नोंदवलं.

मराठी चित्रपटातील आईच्या भूमिकांमधला वेगळेपणा कसा असावा याबद्दल प्रतिक्षा लोणकर यांनी मत मांडले. आता एखादी रागावणारी आई असेल तर ती प्रत्येक दृश्यात रागावू शकत नाही. कधी ती हसेल, कधी ती रडेल पण रागावणं हा तीचा केंद्रबिंदू असेल. पण ती नेहमीच रागावण्याच्या अविर्भावात असणार नाही असं त्या म्हणाल्या. मुळात लिखाण जर चित्तवेधक असेल तर आम्ही कलाकार म्हणून ती भूमिका आणखी उठावदार करु शकतो. असं त्या म्हणाल्या.

या चर्चासत्राच्या उत्तरार्धात मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नाहीत याविषयी चर्चा रंगली. चित्रपट सरकार बनवत नाही. सरकार आपण बनवतो. असं मत यावेळी संजय मोने यांनी मांडले. आपल्या मराठी समाजामध्ये, इतर गोष्टींमध्ये हिंदी चित्रपटांचं भूत खूप आतवर रुजलं आहे.आपल्यात हिंदीपण इतकं घुसलंय की मराठी सिनेमा आपल्याला बघावासा वाटत नाही. मग मराठी सिनेमा करण्यार्याची उमेद मरते असा अनुभव मोने यांनी मांडला. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मनोरंजन हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. असे मत चर्चेच्या शेवटी उपस्थितांनी मांडले.

अशाप्रकारे विद्यार्थांच्या मनातल्या प्रश्नांना मान्यवरांनी मोकळेपणाने उत्तरं दिली.बहुतेक प्रश्नांची उत्तरं देताना वेगवेगळ्या चित्रपटांची उदाहरणं मान्यवरांनी दिल्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना उत्तरांचे आकलन होणे सोपे झाले. हसत-खेळत आणि खेळीमेळीच्या वातावरणात उत्तरोत्तर हे चर्चासत्र रंगत गेले. शेवटी बारायण चित्रपट बनवण्यामागची तयारी आणि इतर गोष्टींची छोटीशी व्हिडीओ क्लिप उपस्थित विद्यार्थ्यांना दाखवून या चर्चासत्राची सांगता झाली.

देवेंद्र जाधव
पत्रकारिता क्षेत्रात अनुभव मिळविण्याचा देवेंद्रचा प्रयत्न असून मराठी साहित्याचा तो विद्यार्थी आहे. माणसांचं निरीक्षण करून त्यांचा स्वभाव जाणून घेण्याची त्याला आवड आहे. त्याचबरोबर विविध विषयांवर लिहिण्याचा त्याला छंद आहे.

Feature Stories

Unit 17 | Circular Motion

OBJECTIVES:

  • express angular displacement in radians
  • solve problems using the concept of angular velocity
  • describe motion along a circular path as due to 
a perpendicular force which causes a centripetal 
acceleration…
  • 13 more words
SECONDARY

Liberty and Coercion

Almost every political philosopher I am aware of from Aristotle down through Montesquieu believed that a democracy/republic had to be small in size.  Self-government required, among other things: 1,846 more words

Book Reviews

Monday Reflection 1

Work and Potential energy reflection with a value of 4 points.

12th Grade