Tags » Anand

Optimization for Your Local SEO On-Page Signals

Getting your site geared up for local SEO is a must.With growing competition out there, remember to do more than local SEO. Optimize your Website  locally it should be grow hike your website. 909 more words

Vadodara

Best and easy Responsive Website Builder

Do you want to develop your website without any coding knowledge then you are on right place. www.pcubedesign.com is a Best and easy tools for Website development. 27 more words

Anand

SEO SURGEON BASED IN GUJARAT

If you are looking for an affordable SEO Consultant in Vadodara, Gujarat. We cannot just rank you well in all the search engines but maintain your stay there, and then you have found one. 335 more words

Vadodara

Devraj Infosys Vadodara-We provide everything under one roof!

Today, our reach covers not only the entire Vadodara

But extends internationally, with a varied range of clients of all sizes,

Across many different sectors. 624 more words

Vadodara

५१२) आनंदाची अभिव्यक्ती - भाग २

       

५१२) आनंदाची अभिव्यक्तीभाग

नाताळची सुटी संपते व शाळा सुरु होते. मराठीच्या तासाला सर वर्गावर येतात व नवीन घडा शिकवू लागतात. वर्गातील मुले सराना आठवण करून देतात कि सुधीरचे उत्तर ऐकायचे बाकी आहे. सर पुस्तक बंद करतात व सुधीरला बोलण्यास सांगतात.

सुधीर उभा राहतो व सांगतो कि सर हा विषय खूप मोठा आहे त्यामुळे एक-दोन शब्दात ह्याचे उत्तर देणे कठीण आहे. त्यामुळे मी माझे विचार लिहून आणले आहेत. असे म्हणून तो कागद सराना  देतो.

सर वाचनात गुंग होतात. वाचून झाल्यानंतर सुधीरला शाबासकी देतात व त्याला त्याचे विचार सांगायची विनंती करतात.

आनंदएक चिंतन:

माणसाच्या आयुष्यात सुखाचे, दु:खाचे, आनंदाचे क्षण रोज येत असतात. कधी त्याला ते क्षण  पकडता येतात किवां  कळतात. कित्येक वेळा ते निसटतात.

माणसाला आनंद कधी होतो? खरे म्हणजे आनंद म्हणजे काय? अर्थात व्यक्ती गणिक ह्याचे उत्तर वेगळे असेल हे काही मी सांगायला नको. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे – इच्छे प्रमाणे आणि वेळेवर घडते तेव्हा आपल्याला आनंद होतो असे म्हटले तर वावगे होणार नाही.

आता हा आनंद कसा व्यक्त करावा किवा केला जातो ह्याचा मागोवा घेवूया. अर्थात ह्याचे  उत्तर पण  व्यक्तीगणिक वेगळे असेल ह्यात काही शंका नाही.

आनंदाचे क्षण  खरेतर रोजच येत असतात. त्याच्यामुळे आपण आनंदी असायला हवे, पण असे होत नाही. आपण जेव्हा एखादे ध्येय ठरवतो, त्याचा पाठपुरावा करतो आणि मग जेव्हा अपेक्षित यश मिळते, तेव्हा तो मात्र खरा आनंदाचा क्षण  असतो. काही जण किवा ते स्वत:हि अश्या आनंदाच्या क्षणी विरजण घालयला तयार असतात, तो भाग वेगळा.

अपेक्षित यश मिळाल्यानंतर काही जण  प्रथम पालकांना – देवाला दंडवत घालतात. त्यांचे आभार मानतात. काही जण त्यानंतर गुरुजनांचे आभार मानायला पळतात. एकमेकाला पेढे – बर्फी भरवली जाते.  काही जण अभिमानाने फुरफुरायला लागतात. पुढच्या योजना आणि स्वप्ने बघणे सुरु होते. काहीना आपल्या मित्रांची आठवण येते व यश साजरे करण्याच्या योजना सुरु होतात.

हि निरीक्षणे प्रामुख्याने व्यक्तिगत आनंदा संदर्भातील आहेत. खरा प्रश्न जो काही वेळा त्रासदायक होतो, तो म्हणजे सामाजिक – धार्मिक  आनंदाच्या क्षणी. अश्या वेळी ज्यांचा ह्या कार्यात सहभाग आहे, त्या सर्वाना आनंद व्यक्त करण्याची पद्धत मान्य असेलच असे नाही. बरेच वेळा हा आनंद आवाजाशिवाय (मोठ्या आवाजात गाणी लावणे, फटाके फोडणे , मोठ्या आवाजात बडबडणे – गाणी म्हणणे वगैरे)  साजराचा करता येत नाही अशी ह्या लोकांची समजूत झालेली असते. बरे तो आवाजही एव्हडा मोठा असतो कि त्यांना  तरी तो सहन होतो का? हे हि विचारात घेतले जात नाही. अश्या प्रसंगांची कितीही उदाहरणे देता येतील.  (उ.ह. लग्न, मुंज व इतर धार्मिक कार्ये, आपले सण , खेळात विजय , निवडणुकीत विजय, वार्षिक गेट टू गेदर,  सभा वगैरे.)

मित्रानो, तुम्ही कसा आनंद साजरा करता? तुम्ही कधी ह्या गोष्ठीचा विचार केला आहे का?

सुधीर वैद्य 

०३०१२०१७

=========================================

५०८) आनंदाची अभिव्यक्तीभाग /  २२ डिसेंबर २०१६ ला अपलोड केला होता

स्थळ: शाळा

वेळ: सकाळची

महिना: तोंडी परीक्षा – हजरजबाबीपणाची  :)

विषय : आनंदाची अभिव्यक्ती

————–

मराठीच्या तासाची घंटा होते व शिक्षक वर्गात प्रवेश करतात. आज तोंडी परीक्षा असते. शिक्षक: मुलांनो, सुप्रभात. आज मी तुम्हाला एक विषय देणार आहे. एक किंवा दोन शब्दात तुम्ही आनंद कसा व्यक्त केला जातो हे सांगायचे आहे. एक एक विद्यार्थी उत्तर देऊ लागतात.

विद्यार्थी: आवाज करून

विद्यार्थी: मोठ्या आवाजात गाणी लावून

विद्यार्थी: बॅण्ड

विद्यार्थी: नाचून

विद्यार्थी: फटाके लावून

विद्यार्थी: कट आऊट लावून

विद्यार्थी: रांगोळ्या काढून

विद्यार्थी: रोषणाई करून

विद्यार्थी: कमानी उभारून

विद्यार्थी: जल्लोष करून

विद्यार्थी: घोषणा देऊन

विद्यार्थी: अभिनंदन करून

विद्यार्थी: मिठाई – पेढे वाटून

अश्याप्रकारे जवळ जवळ सर्व विद्यार्थी उत्तरे देतात. सुधीर बोलायला उभा राहतो आणि तास संपल्याची घंटा होते. सर सांगतात कि उद्यापासून मी रजेवर आहे व पुढील आठवड्यात शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे सुधीरचे उत्तर आपल्याला नवीन वर्षातच ऐकायला मिळेल.

मधल्या वेळेची सुटी असल्यामुळे मुले आरडा ओरड करत वर्गाच्या बाहेर पडतात.

सुधीरच्या विचारांचे पाखरू भूतकाळात उडायला लागते. मनात विचाराचे तरंग उमटू लागतात. काय असतील सुधीरच्या मनातील विचार?

सुधीर वैद्य

२२१२२०१६

टीप: काल्पनिक लेख. साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. :)

Spandane Articles

Premier Website Development Company in Gujarat

If you are looking for an experienced website development Company in Vadodara, Gujarat. With a variety of skills all under one roof, at a significant cost savings, look no more. 408 more words

Vadodara