Tags » Aunt

नातेवाईक

टीप : मी जवळपास साडेपाच वर्षांनंतर मराठी भाषेत लिहितो आहे. बारावीच्या परीक्षेच्या वेळी मराठी पेपर झाल्यानंतर “आपल्याला पुन्हा मराठीत लिहावे लागणार नाही!” अशी अपेक्षा होती, आणि काहीसा आनंद देखिल होता. पण शेवटी मातृभाषा, तिची ओढ वेगळीच असते.
हे सर्व मी स्वतः लिहिलंय, त्यामुळे अर्थातच एक ‘सेकंड ओपिनियन’ घेऊन चुका दुरुस्त करून घेणे गरजेचे होते. त्यात सागर बगाडे सरांची खूपच मदत झाली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
मी मराठीत लिहिले, यावरच एक अर्ध्या लोकांना विश्वास बसणार नाही, तर दुसऱ्या अर्ध्या लोकांना हार्ट अ‍टॅक येण्याची दाट शक्यता आहे. तरी पहिल्या अर्ध्यांनी विश्वास ठेवावा, व दुसऱ्या अर्ध्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.

धन्यवाद.

कोल्हापुरी पाहुणे हे म्हणजे कोल्हापुरी पावसासारखे असतात. केवळ कोल्हापुरीच नव्हे, तर एकंदर पाहुण्यांची जातच तशी आहे. सीझन असताना क्वचितच येणारे, आणि अगदी आपण पूर्ण तयारीनिशी घराबाहेर पडणार, तेव्हा, “अहो, बाहेर निघाला वाटते?!” असं म्हणत घरात शिरणारे…. उदाहरणार्थ दिवाळीच्या वेळी.
आई बजावून सांगत असते, “आज कुठेही बाहेर जाऊ नका, सणाची वेळ आहे, पाहुणे घरी येणार, घरी थांबले पाहिजेस…”, वगैरे. आणि नेमके त्याच दिवशी सगळ्या पाहुण्यांच्या घरी हाच सीन असतो. बरं, एखाद्या दिवशी ठरवून, “आज अमक्या अमक्या काकांकडे जाऊया ह” असं म्हणणार, तर आपण बाहेर असताना नेमका त्याच काकांचा फोन येतो, “अहो, घरी आलोय तुमच्या, बाहेर गेलात वाटते!” आता ह्यांना कोण सांगणार, आम्ही तुमच्याच घरी आलो आहोत म्हणून. अशा वेळी थोडी गम्मत सुद्धा वाटते. “कॉमेडी ऑफ एरर्स” हे वाक्य शेक्सपिअरनी बहुदा याच परिस्थितीला डोक्यात ठेवून उद्गारले असावे. असो. याला उपाय देखील आहे; एक फोन कॉल करून त्या काकांना, “तुम्ही घरी आहात का, आम्ही येतोय फराळाला” असे सांगता येते. पण तसे केले, तर मजा काय?
असे बरेचसे पाहुणे वर्षभर येत जात राहतात. काही नुसते सुखाच्या वेळी येतात, काही दुःखाच्या वेळीच येतात. आमच्या वडिलांच्या एक नाशिकच्या आत्त्या आहेत, त्या तर घरी कोण वारले असेल तरच येतात. वर आणि घरी आल्यावर, “बरं ते नाही, तुमच्याकडे पाणी तापवायला गैस वापरत नाही का?” असा एक प्रश्न देखील नेहमी विचारतात. मग मी, किंवा माझ्या बहिणीने गिझर सुरु करून दिला कि आपल्या सुनेला लगेच, “मुलं मात्र हुशार आहेत हा तुझी!” गिझर सुरु करण्यात काय हुशारी असते त्याचं त्यांनाच ठाऊक. आई मात्र लगेच, “एहेहे, तशी आहेत हुशार, अधून मधून जरा… एहेहे…!” नेहमीचं आहे.
काही पाहुणे हवेसे असतात, काही अगदीच नको नकोसे असतात. पण शेवटी पाहुणे आहेत, करणार तरी काय? एखादी तिर्राहित व्यक्ती असेल तर, “सर आत्ता घरी नाही आहेत, तुम्ही नंतर फोन करून या” असे सांगता येते. डॉक्टर असल्याचा माझ्या आई वडिलांना हा एक फायदा आहे. पण एखादा नको असलेला पाहुणा घरी आला, तर त्यांना हे सांगू शकत नाही, कारण जर तसे सांगितले, तर, “त्यांच्या मुलांना काहीच शिकवले नाही आहे बाई, साधा चहा देखील विचारला नाही बघा!”.
असे असताना, काही पाहुणे असेही असतात, ज्यांची चाहूल देखील लागली ना, तरी बरे वाटते.
अशीच माझी एक आत्त्या आहे. या जगात अशी एकच व्यक्ती आहे, जी जरी रात्रीच्या २:३० वाजता आली, तरी देखील मला फारसे काही वाटणार नाही. उलट चांगलंच वाटेल. ही आत्त्या म्हणजे आमच्या वडिलांची धाकटी बहिण. वडिलांचा तिच्यावर जितका जीव, तितकाच आत्त्याचा तिच्या भावावर. आमचे वडील नेहमी सांगत असतात. “सांगलीत मेडिकल कॉलेज ला होतो, तेव्हा ही तुझी आत्त्या, स्वतःची पर्स रिकामी करून, तिची स्वतःची पाकेट मनी मला द्यायची, दादा तू ठेव म्हणून!” यावर आत्त्या नुसती हसते, आणि, “हो, आणि हा दर रविवारी सगळे धुणे घेऊन यायचा, मग मीच सगळं धुणं धुऊन द्यायची!” असं सांगते. ही गोष्ट मी गेली पंधरा एक वर्ष ऐकतोय, पण मला कंटाळा नाही येत. हे सगळं झालं, कि पप्पा एकदमच, “आणि तुम्ही भावंडं बघा, नुसतं भांडण सोडल्यास काही करत नाही!” यावर मी आणि माझी बहिण काहीच बोलत नाही. कारण वेळ तशी नसते. एक जुनियर भावंडं विरुद्ध एक सिनियर भावंडं?
या आत्त्याचा स्वभाव म्हणजे काय सांगायचा. तसं तिने योगा मध्ये एम ए केलंय. पण ही जर एखाद्या सरकारी ऑफिस मध्ये हाय पोस्ट ला असती, तर मजाच आली असती. एखादा मोर्चा वगैरे बाहेर येऊन थांबला, तर ही स्वतः त्या ऑफिसचं किचन वापरून त्या मोर्च्यातील कार्यकर्त्यांना चहा वगैरे करून देईल. आम्ही शाळेत शिकत असताना उन्हाळ्याची सुट्टी लागली कि सगळ्यात आधी पोहायला जाणार याची उत्सुकता, आणि त्या मागोमाग ‘आत्त्याच्या घरी राहायला जायचं!’ याची असायची. त्यामुळे सुट्टीत तिची २ मुले, मी व माझी बहिण, आमच्या मोठ्या काकांची ३ मुले, आणि एखादा गेस्ट अपिअरन्स देणारी दीदी, अशी एक १० जणांची टोळी त्या घरात असायची. तसं आम्ही घरात नासायचोच, कारण दिवसभर काही न काही तर खेळायला सगळेजण बाहेरच असायचो. मग आम्हाला शोधत, हाका मारत, थोडासा रागावलेला चेहरा करत आत्त्या बाहेर यायच्या, आणि आम्हाला अक्षरशः ओढून घरी न्यायच्या. रात्रीचं जेवण झाल्यानंतर सगळ्यांना झोपी घालायच्या. त्यात आमच्यात ‘झोपल्याची आक्टिंग करा, नंतर दंगा करूया’ असाही संदेश आमच्यातल्या मोठ्या मेंबर्स कडून यायचा. बहुदा आत्त्याला हे ठाऊक असावं, कारण आम्ही उठून बसणार, इतक्यात ती दरवाजा उघडून परत आत यायची, तेही हसत. पुन्हा सगळ्यांना झोपी घालण्याचा प्रयास सुरु.
नुकतेच आत्त्याने घरीच योगाचे क्लासेस सुरु केले. माझी बहिणही थोडे दिवस गेली. ती घरी परत आली कि आम्ही, “आज काय शिकवलं?” न विचारता, “आज काय खाल्लस?” हाच प्रश्न विचारायचो. आत्त्याच्या हाताला एक वेगळी चव असते. त्यामुळे जरी मला कधी एखादे, “डबा देऊन ये” असे काम लागते, तेव्हा जरी गडबडीत असलो तरी काहीतर खाल्ल्याशिवाय ती घराबाहेर सोडत नाही, आणि मी जातही नाही.
आम्ही भावंडं जसजसे मोठे होत गेलो, तसतसे शिकायला बाहेरही गेलो. माझ्या वयाचा तिचा मोठा मुलगा पुण्यात असतो, तर काकांची मुलगी चेन्नई ला असते. मी सद्ध्या तरी इथे आहे, पण लवकरच मीही नसेन. पण कधीही एखादे कार्यक्रम असेल, तर आत्त्या स्वतः सर्वांना घरी बोलावते, आणि कोण नसेल तर त्याला फोन करून सगळ्यांना बोलायला लावते. स्वतः मात्र नाही बोलत.
शिक्षणासाठी मीही बाहेर जाईन, तेव्हा कदाचित मलाही असाच फोन येईल. मला ते टीवी मध्ये दाखवतात तसं ‘परिवाराशी नातं जपून ठेवणे’ वगैरे भानगड जमत नाही. मुळात नाती जपणे, हे मला लहानपणापासूनच जमलेलं नाही. पण इथल्या काही गोष्टी मला सारख्या आठवतील, मला परत येण्यास भाग पाडतील, त्यात “आत्त्या” एक आहे.

Art And Literature

The Funeral by Norman Dubie

“The Funeral”
It felt like the zero in brook ice.
She was my youngest aunt, the summer before
We had stood naked
While she stiffened and giggled, letting the minnows…
134 more words

Poetry

19 Things I'm Thankful For


So since this has been a special year for me (like every year), I thought I would write a post about 19 things I’m thankful for! 665 more words

The 12 Days of Christmas begins

One of my most favorite times of the year is here! I love all the shopping, traditions and other activities leading up to Christmas. I love the magic of the season. 223 more words

Mom

How I Became My Aunt

I have been musing about favorites.

Favorite food:  omelette from Hamburg Inn in Iowa City.  Favorite TV show:  Gilmore Girls.  Favorite book: Barbara Comyns’  … 644 more words

It’s All Fun and Games Until Someone Loses a Shoe. (Or an Election.)

As Thanksgiving 2016 winds to a close, there’s just one thing left to do: Brady and I each wrap a pinky finger around one side of the wishbone from our turkey dinner. 3,366 more words

Super Aunt's Observations on How Kids Get it Right

After a week with my family over Thanksgiving week and being a self proclaimed Super Aunt, I feel so much love and gratitude for the innocence and wisdom of kids. 521 more words