Tags » Blames

प्रोजेक्टसाठी राहुल गांधी टाकायचे दबाव, नटराजन यांचा काँग्रेसला घरचा आहेर

चेन्नई/नवी दिल्ली- ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयंती नटराजन यांनी शुक्रवारी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. राहुल यांच्या सांगण्यावरून आपण अनेक प्रकल्प रोखले होते, असे त्या म्हणाल्या. तथापि, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

जयंती नटराजन यूपीए-२ सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री होत्या. त्यांच्यावर अनेक महत्त्वाचे प्रकल्प रोखल्याचा आरोप होता. त्यांनी शुक्रवारी चेन्नईत पत्रपरिषदेत काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या, प्रकल्पांच्या मंजुरीबाबत पर्यावरणमंत्री म्हणून नियमांसोबतच पक्षनेतृत्वाच्या आदेशांचे पालन केले होते. मात्र आता पक्षात लोकशाही राहिलेली नाही. येथे घुसमट होत असल्याने राजीनामा देत आहोत. तूर्तास इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी त्यांचे आरोप फेटाळत सांगितले की, त्या आपल्या नव्या राजकीय गुरूंच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.

सोनियांना लिहिलेल्या पत्रात सांगितली आपबीती
नटराजन यांच्या राजीनाम्याबरोबरच त्यांनी गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला सोनिया गांधी यांना लिहिलेले एक पत्रही प्रकाशात आले. यात त्यांनी एकूण परिस्थितीचे यथार्थ वर्णन केले आहे.

1. राजीनामा दिला नव्हे, घेतला
१९ डिसेंबर २०१३ : जयंती नटराजन यांनी कस्तुरीरंगन अहवालाच्या आधारे पश्चिम घाट संरक्षणासंबंधी आदेश दिला होता. यात ज्या उद्योजकांचा स्वार्थ होता त्यांचा विरोध सुरू होता.

२० डिसेंबर २०१३ : तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मला बोलावून घेतले. सांगितले की, मी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि पक्षकार्यात झाेकून द्यावे, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे.

2. प्रतिमा मलिन झाली तरीही शांतच
२१ डिसेंबर २०१३ : राहुल यांनी फिक्कीच्या परिषदेत उद्योगपतींना ‘पर्यावरण मंजुरीत आडकाठ्या येत असल्याने तुम्ही अस्वस्थ आहात. आता हा विलंब होणार नाही’, असे सांगितले. यानंतर माझ्या कार्यपद्धतीकडे शंकेने पाहिले जाऊ लागले. तरीही मी शांत होते.

3. राहुल यांनी भेटीसाठी वेळच दिला नाही

२१ डिसेंबर (सायंकाळी) : राहुल यांचे भाषण यू ट्यूबवर ऐकले. त्यांना भेटीसाठी वेळ मागितली. ते म्हणाले, ‘सध्या मी व्यग्र आहे. नंतर भेटू.’ ताे भेटीचा दिवस आलाच नाही. खुन्यालाही न्यायालयात बाजू मांडण्याची संधी मिळते. मला ती संधी दिली नाही.

4. तुम्ही सांगितले तेच आदेश पाळले
जानेवारी २०१४ चा पहिला आठवडा : तुमची (सोनियांची) भेट घेऊन माध्यमांत माझ्याबद्दलच्या नकारात्मक बातम्यांबद्दल सांगितले. यावर तुम्हीही माध्यमांशी न बोलण्याचा सल्ला दिला. मी गप्पच राहिले. यानंतर मात्र मला पक्षामध्ये कोणतीही जबाबदारी मिळाली नाही. Read More…

प्रोजेक्टसाठी राहुल गांधी टाकायचे दबाव, नटराजन यांचा काँग्रेसला घरचा आहेर

नवी दिल्ली – कांग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन आज काँग्रेसला रामराम ठोकला असल्याचे वृत्त आहे. कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र मिडियामध्ये लीक झाल्याने नटराजन यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

जयंती नटराजन पर्यावरण मंत्री असताना विकासकामांशी संबंधित काही प्रोजेक्ट थांबवण्यासाठी राहुल गांधींनी त्यांच्यावर दबाव आणला होता. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार सोनियांनी अद्याप या पत्राचे उत्तर दिलेले नाही. नटराजन यांनी अनेकदा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांना भेटता आले नाही. दरम्यान, राजीनाम्यानंतर नटराजन कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत अद्याप काहीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

एका कॅबिनेट मंत्र्यानेही आपल्यावर काही प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी दबाव आणला होता, असेही नटराजन यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र, आपण ते स्वीकार न करता प्रोजक्टसना मंजुरी दिली नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राहुल गांधींच्या दबावानंतर त्यांना निर्णय बदलावा लागला आणि पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

राहुल यांनी खोट्या बातम्या छापल्या
नटराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरणासंबंधी मंजुरी नाकारल्याच्या निर्णयाने नाराज झालेल्या राहुल गांधींनी नटराजन यांच्या विरोधात माध्यमांमध्ये नकारात्मक प्रचार केला. त्यामाध्यमातून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी पक्षाचे काम करण्यासाठी नव्हे तर हायकमांडने सांगितल्याने राजीनामा दिल्याचेही सर्वांसमोर सांगण्यात आले. यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात भूमिका राहुल गांधींची महत्त्वाची भूमिका असायची असेही, नटराजन यांनी पत्रात लिहिले आहे. Read More…

Super Woman ~ Conflicts Within

Been thinking about writing this blog for a while, however somehow was not able to put the PAIN, I saw and felt in the eyes of my client into words. 669 more words

Thoughts That Changed My Life

Attacks Blamed on ‘Shape-Shifting Jews’

Link to article.

Daily Beast reporter finds French-Algerians believe Paris shootings were Jewish plot to make Muslims look bad

Sure, the horrific series of terror attacks that rocked France last week could have been carried out by Islamist terrorists. 456 more words

News