Tags » B.S. Yeddyurappa

Yeddyurappa writes to EC, alleges foul play in Karnataka election

B S Yeddyurappa, the BJP chief in Karnataka has written to the Election Commission alleging foul play in the recently concluded Karnataka assembly elections. His letter comes days after cases of voter verifiable paper audit trail machines were found abandoned in a shed in Vijaypura district.

Read more 

Vicky Nanjappa

Karnataka: Kumaraswamy responds to Shah's 'unholy Cong-JD(S) alliance' jibe

A political slugfest between the Bharatiya Janata Party (BJP) and the Congress continues in Karnataka, even days after the results to the Karnataka Assembly election 2018… 160 more words

History repeats: No CM from Shivamogga has completed his term

There have been four Chief Ministers that Shivamogga has produced. Ironically none of them have completed their term. This has been a trend with CM candidates from Shivamogga, the home town of B S Yeddyurappa since 1956.

Read more

Vicky Nanjappa

राष्ट्रनिर्माण…!

कर्नाटक विधानसौधमधील बहुमत चाचणीच्या विशेष अधिवेशनाचे जाहीर प्रक्षेपण व्हावे, ही भाजपाची इच्छा होती. घडलेही तसेच. तेथे जे काही घडले, ते जसेच्या तसे सामान्यांपर्यंत पोहोचावे, माध्यमांनी मिठमसाला लावून दिलेले वार्तांकन नको, ही पक्षाची भूमिका होती. भाजपाशी थेट लढण्याची ताकद आजच्या तारखेला कोणत्याही विरोधी पक्षात नाही. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस या अभद्र युतीने एकत्र येत, भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. तेही शक्य झाले ते बेंगळूरू येथील ३५ लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क तसेच आद्य कर्तव्य न बजावल्यानेच. केवळ बेंगळुरू येथील ६ जागांवर भाजपाचा झालेला निसटता पराभव भाजपाचे संंख्याबळ १०४ वर रोखणारा ठरला. ३० जागा तर अशा आहेत, जेथे भाजपा १००, २००, ४००, ५०० ते १ हजार इतक्याच मताधिक्क्याने पराभूत झाला. त्यामुळेच निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या ज्या बी. एस. येडियुरप्पांनी जिवाचे रान केले होते, त्यांना केवळ अपुऱ्या संख्याबळामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला, हे जसे राज्यातील जनतेला आहे तसे पहायला मिळाले, तसेच येडियुरप्पा यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही प्रसंगी कसा भावनिक होतो, हेही पहायला मिळाले.


जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे, परंतु संख्याबळ पुरेसे नाही. मात्र, हा विश्वास नक्की आहे, की पुढील वेळी आम्ही परत येऊ, किमान १५० जागांवर विजयी होऊ. राष्ट्रनिर्माणाचे जे कार्य हाती घेतले आहे, ते पूरे करूच. तोपर्यंत अविरत परिश्रम थांबणार नाहीत, हा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात येडियुरप्पा यशस्वी झाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत, येडीयुरप्पा यांनी घेतलेला हा निर्णय कर्नाटकातील जनता विसरणार नाही, असाच आहे. जनताच नव्हे, तर काँग्रेसलाही हे चांगलेच लक्षात राहील. कर्नाटकात काँग्रेसची अस्ताकडे सुरुवात झालेली आहे, तर भाजपाची नव्याने उदयाची…

काँग्रेस केवळ सत्तेसाठी लाचार होत, जेडीएससारख्या प्रादेशिक पक्षापुढे कसा लाचार होतो, हे गेल्या चार दिवसांतील घडामोडींमुळे स्पष्ट झालेच होते, विधानसौधमधील थेट प्रक्षेपणाने त्यावर शिक्कामोर्तब केले. कर्नाटकात सत्ता मिळाली, खाण्याकरिता काहीतरी मिळाले, भले ते जेडीएसने फेकलेले उरलेसुरले का असेना… काँग्रेसला ते पुरेसे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.


वाजपेयी यांनी जेव्हा राजीनामा दिला होता, तेव्हा भाजपा स्वबळावर दिल्लीत स्थापन करेल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र, देशभरातील जनतेने वाजपेयी यांची संख्याबळाअभावी झालेली अगतिकता पाहिलेली होती. बाजारात विकण्यासाठी कोणी नव्हते, असे नव्हते, मात्र, खरेदीदारच नव्हता, हे त्यांचे वाक्य आजही कानात आहे. येडियुरप्पा यांनी संख्याबळ नसताना दावा का केला, पदाची शपथ का घेतली, इतर कोणाला का दिली नाही, या साऱ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे राज्यातील जनतेशी त्यांना थेट संवाद साधायचा होता. पत्रकार परिषद घेऊन फारतर निवडक जनतेपर्यंत ते पोहोचू शकले असते. मात्र, विधानसौधमधून त्यांनी केलेले भाषण ना केवळ कर्नाटकातील जनतेने पाहिले, तर देशभरातील सर्वसामान्य जनतेनेही पाहिले, ऐकले. त्यातून जो बोध घ्यायचा तो घेतला.

काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये प्रमुख विरोधक होता, तो आज डाव्यांच्या सहकार्याने मोर्चेबांधणी करते आहे. कशासाठी तर भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी. कर्नाटकातही तेच झाले. जेडीएससारख्या मरणपंथाला लागलेल्या पक्षाला काँग्रेसने ताकद दिली, बळ दिले. कारण तेच. भाजपाला रोखण्यासाठी. देशभरात थोडेफार असेच चित्र आहे. प्रादेशिक पक्षांना हाताशी धरत काँग्रेस भाजपाला थोपविण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्नात आहे. कोणे एके काळी जेथे काँग्रेसची एकहाती सत्ता होती, त्याच राज्यांमध्ये तो प्रादेशिक पक्षांना चुचकारत, त्यांच्याशी युती करत, विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. सत्ताधारी ते विरोधकांमधील एक अशी पक्षाची अधोगती झालेली आहे, तर भाजपाचे कमळ नवनव्या राज्यांमध्ये फुलत आहे, सत्तेवर येत आहे. भटा-बामणांचा पक्ष अशी ज्याची संभावना होती, त्याच पक्षाला आज ओबीसी-दलित बांधवांचा सर्वांत मोठा जनाधार आहे. उत्तर भारतीय पक्ष असे ज्याला उपेक्षेने संबोधले जात होते, त्या पक्षाची सत्ता ना केवळ उत्तर भारतात आहे, तर दक्षिणेत अगदी कर्नाटकपर्यंत आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये पक्षाचा वाढता विस्तार ममता यांची झोप उडविणारा ठरला आहे, तर ओडिशात नवीन पटनाईक यांची अवस्था फारशी वेगळी नाही.

अटलबिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिल्यापासून भाजपाला मित्र पक्षांची कमतरता कधीही पडली नाही, परंतु काँग्रेस आज नवनव्या मित्र पक्षांच्या शोधात आहे. कोणाशी आघाडी करायची, हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.


येत्या काही काळात कर्नाटकसारखी परिस्थिती अन्यत्रही निर्माण होऊ शकते. सत्तास्थापनेसाठी भाजपाला ५ ते १० जागा कमी पडू शकतील. पश्चिम बंगाल असो वा केरळ. कोणीतरी दुसरा येडियुरप्पा तेथे संख्याबळाअभावी अगतिक झालेला देश पाहेल. बिहारमध्ये जसे भाजपाविरोधात सारे पक्ष एकवटले होते, तसेच अन्यत्रही ते एकत्र येऊ शकतात. किंबहुना कर्नाटकात त्यांना भाजपाला रोखण्याचा मार्गच सापडलाय. विरोधकांनी परस्परांतील वैर विसरून एकत्र येण्याचा. मात्र, भाजपाला रोखणे हे केवळ अशक्यप्राय असेच आहे. राष्ट्रनिर्माणाचे कार्य हाती घेतलेल्या विचारधारेचा हा प्रवाह आहे. एका रक्तरेखेचा हा प्रवास आहे. आजवरच्या प्रवासात या रक्तरेखेने अनेक बळी घेतलेत. राष्ट्र निर्माणासाठी शेकडो ज्ञात-अज्ञातांनी स्वतःहून या महायज्ञात आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या आहेत. नचिकेत होऊन.

भाजपाने घोडेबाजार टाळून राजकारणातील शुचिर्भूतता जपली, यावर काही पत्रपंडितांना असे वाटते, की मग भाजपाने संख्याबळ नसताना सत्तास्थापनेचा दावा केलाच कशासाठी… त्यांच्या या प्रश्नाचे उत्तरच आम्ही दिलेले आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याचा आमच्यालेखी हा अन्वयार्थ…

संजीव ओक

संजीव ओक

अंताकडे वाटचाल

कर्नाटकात गेल्या ५ दिवसांत ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्यातून एक संदेश स्पष्टपणे कर्नाटकातील जनतेला मिळाला आहे. तो म्हणजे काँग्रेसला संपवा, त्यांच्या सत्तालालसेला नष्ट करा, घराणेशाहीवर अखेरचा घाला घाला. हा संदेश कोण्या नेत्याने नाही, तर काँग्रेसने आपल्या स्वतःच्या कर्माने दिलेला आहे. लिंगायत बांधवांना हिंदू धर्मापासून तोडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न ज्या काँग्रसने केला होता, त्याच काँग्रेसविरोधा लिंगायत बांधव एकवटले आहेत. लिंगायत मठाधिपतींनी भाजपाच्या बी. एस. येडियुरप्पा यांना आशिर्वाद दिले होते. त्या मठाधिपतींवर श्रद्धा असलेल्या तमाम लिंगायत बांधवांनी, ज्या काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला, त्याची किंमत त्यांना कर्नाटकातून हद्दपार करून मोजती करा, असाच हा संदेश आहे. जातीपातीत फूट पाडणाऱ्या काँग्रेसविरोधात संपूर्ण लिंगायत समाज एकवटला असून, तो आता भाजपाच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे.


काँग्रेसने कर्नाटकात जी चूक केली, ती निस्तरणे आता त्यांच्या हातात राहिलेले नाही. म्हणूनच काँग्रेसला म्हणजेच गांधी घराण्याला तेथून आता मुळापासून उखडून फेकले जाणार आहे. हे कसे घडणार, ते येत्या काही कालावधीतच स्पष्ट झालेले असेल. कर्नाटक विधानसभेत ७८ इतके संख्याबळ असलेला हा पक्ष ३७ जागा असलेल्या जेडीएसला संपूर्ण पाच वर्षांसाठी सोबत करेल, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. अगदी देवेगौडा ते कुमारस्वामीही त्याचवेळी पुढील रणनित आखत आहेत. प्रादेशिक पक्षांना शपथविधीला आमंत्रण करण्यामागचा जेडीएसचा हेतू स्पष्ट आहे. गेल्या दशकापर्यंत राष्ट्रीय राजकारणात कळीचे भूमिका बजावणारे प्रादेशिक पक्ष आज कुठल्याकुठे फेकले गेले आहेत. उत्तर प्रदेशावर राज्य करणारा बसपा, सपा यांचे अस्तित्व तर नावापुरतेच. इथे शिवसेनेचा महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपाशी उभा दावा का, हे स्पष्ट होते. शिवसेनेने भाजपाशी जे वैर पत्करले आहे, ते स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठीच. म्हणूनच उद्धव वेळोवेळी पश्चिम बंगालमधील ममता तसेच आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांच्या संपर्कात असतात. ममता यांनी मध्यंतरी उद्धव यांची जी मुंबईत भेट घेतली होती ती त्यामुळेच. कुमारस्वामींनीही म्हणूनच या उरल्यासुरल्या नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी बोलावले आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त साधून जेडीएसचा पाठिंबा काढून घेईल, हा अंदाज आहे.

लिंगायत समाजाचे कर्नाटकातील राजकारणात जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच वोक्कलिगा समाजालाही आहे. कुमारस्वामी हे वोक्कलिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे काँग्रेसने त्यांना धोका दिला की, हा समाज काँग्रेसशी थेट फारकत घेईल. उत्तर कर्नाटकात लिंगायत समाज बहुसंख्य असून, दक्षिण कर्नाटकात वोक्कलिगांचे प्राबल्य आहे. म्हणजेच उत्तर कर्नाटक ते दक्षिण कर्नाटक, या दोन्ही पट्ट्यात काँग्रेसचे पानिपत होणार, हे आताच निश्चित झालेले आहे.

कर्नाटकच्या प्रचारात जेडीएसला संपविण्याचा काँग्रेसने जी रणनिती आखली होती, ती योग्य अशीच होती. ठराविक मर्यादा असलेला प्रादेशिक पक्ष इतपतच जेडीएसची ओळख होती. २००६-०७ साली देवेगौडा-कुमारस्वामी यांनी सत्तावाटपावरून भाजपाची जी फसवणूक केली होती, त्यामुळे तेथील जनतेने त्यांना गेल्या दहा वर्षांपासून सत्तेपासून दूरच ठेवले होते. याचा अर्थ त्यांनी काँग्रेसला स्वीकारले होते, असा अजिबात नव्हे. येडियुरप्पा यांच्या बंडखोरीमुळे गेल्या वेळी काँग्रेसच्या वाट्याला सत्ता आली होती. त्यामुळे लिंगायत बांधवांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देत, त्यातील काही मते आपल्याकडे वळविण्याचे काँग्रेसी कारस्थान काही अंशी यशस्वीही ठरले होते. किंबहुना या निवडणुकीनंतर जेडीएस एका ठराविक भागापुरतीच मर्यादित राहिली असती. मात्र, तिला संजीवनी देण्याचे काम काँग्रेसने केले. मैसूर प्रांतापुरत्या मर्यादित असलेल्या जेडीएसला राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर आणण्याचे काम काँग्रेसने केले. लिंगायत आणि वोक्कलिगा हे दोन्ही समाज आजच्या तारखेला काँग्रेसपासून अंतर राखून आहेत. त्यापैकी लिंगायत समाज तर सरळसरळ विरोधात गेलेला आहे. वोक्कलिगा समाजाचा चेहरा म्हणून कुमारस्वामी यांना ओळखले जाते. त्याच कुमारस्वामींना आता मुख्यमंत्रीपदी बसवण्याची घोडचूक काँग्रेस करत आहे. त्याचवेळी कर्नाटक काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या, परमेश्वर आणि खर्गे हे तीन गट कार्यरत झाले आहेत. राज्यात काँग्रेस मोठी करायची असेल, तर या तीन नेत्यांच्या मतभिन्नतेमुळे तेही शक्य नाही. राजकारणात आपली जागा कधीही दुसऱ्या पक्षाला द्यायची नसते, तुम्हाला ती परत मिळत नाही, याचा विसर पडल्यानेच कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची माळ देण्याचे आश्वासन काँग्रेसने जेडीएसला दिले. २००२ साली अशीच चूक भाजपाने उत्तर प्रदेशात केली होती. समाजवादी पक्षाला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावरील भाजपाने तिसऱ्या क्रमांकावरील बसपाच्या मायावती यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. या एका चुकीमुळे भाजपा तेथे प्रत्येक निवडणुकीत ठराविक जागा हारत गेला. २००२ ते २०१४ पर्यंतच्या निवडणुकांची आकडेवारी तपासून पाहिली, तर भाजपाला ही एक चूक किती महागात पडली होती, हे सहज लक्षात येते. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे देशभरात भाजपाचे जे जबरदस्त वादळ आले, केवळ त्यामुळेच उत्तर प्रदेश पुन्हा भाजपाच्या हाती लागले. काँग्रेसची आजची अवस्था पाहता, देशभरात वादळ आणणारा तर सोडाच, आहे त्या जागा राखण्याचे आव्हानही काँग्रेसला पेलणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.


दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून ज्या कर्नाटक राज्याची ओळख आहे, त्या कर्नाटकात काँग्रेस केवळ जेडीएस या प्रादेशिक पक्षाला पाठिंबा देणारा पक्ष म्हणून यापुढे ओळखला जाईल. अर्थात काँग्रेसने उत्तर प्रदेशात सपा, बिहारमध्ये राजद आणि झारखंडमध्ये हेच काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त कर्नाटक हा जो नारा दिला होता, तो पूर्ण करण्याचे काम स्वतः काँग्रेसनेच केले आहे. केवळ काँग्रेसला पराभूत करणे म्हणजे काँग्रेसमुक्त असा अर्थ होत नाही, तर त्यांना ना सत्तेत, ना विरोधक म्हणून राज्यात निष्क्रीय करणे, म्हणजे राज्य काँग्रेसमुक्त झाले, असा अर्थ होतो. एकेका राज्यातून जेव्हा काँग्रेस जेव्हा अशी नामधारी होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने देश काँग्रेसमुक्त होईल. शनिवारी कर्नाटकात तर काँग्रेसमुक्तच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. इथे आता भाजपा आणि जेडीएस यांंच्यातच भविष्यात लढत होणार आहे. म्हणूनच टीएमसीच्या ममता यांनी जेडीएसचे अभिनंदन करताना, हा प्रादेशिक पक्षांचा विजय असल्याचे जे म्हटले आहे, ते वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रादेशिक पक्षांना संजीवनी देणारा काँग्रेसचा निर्णय, हे विधान अधोरेखित करणारे आहे. ममता यांनी ना काँग्रेसचा नामोल्लेख केला, ना राहुल गांंधी यांचा. भविष्यात अशी अवहेलना, मानहानी काँग्रेसच्या वाट्याला येणारच आहे. ही तर सुरुवात आहे. पराभव पचवणे जसे अवघड असते, तसचे विजयाचे भान राखणेही. काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी ते राखले नाही. म्हणूनच राज्यपालांना कुत्रा असे संबोधत त्यांनी काँग्रेसी बेतालपणा दाखवून दिला. प्रत्यक्षात हा विजय कोणाचाच नाही. शनिवारी बहुमत चाचणी न देता राजीनामा दिला, म्हणून भाजपा जिंकलेले नाही, किंवा भाजपा सत्तेवर आला नाही, म्हणून काँग्रेसचा विजय झालेला आहे. पराभूत झालेली आहे ती जनता. राजकारणावर कॉफी शॉपमध्ये बसून चर्चा करणारी, राजकारण किती घाणेरडे आहे, भ्रष्टाचार कसा फोफावला आहे, यावर तावातावाने जे सुशिक्षित मतदार आपली मते आग्रहाने मांडत असतात, त्या मतदारांनी आपला अडाणचोटपणाच दाखवून दिलेला आहे. ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी ८० पर्यंत पोहोचते, परंतु बेंगळुरू सारख्या शहरी भागात ती जेमतेम ४२ टक्के इतकीच राहते. म्हणजेच ज्यांना आपले हक्क काय आहेत, सरकारकडे काय मागण्या करायच्या हे चांगलेच माहिती आहे, त्यांच्या नाकर्तेपणाचे फळ म्हणून संपूर्ण राज्याने भाजपाच्या बाजूने दिलेला कौल प्रत्यक्षात येऊ शकला नाही. असो.

कर्नाटकात लिंगायत समाज हा राजकारणात निर्णायकी भूमिका बजावणारा आहे. काँग्रेसने त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करून, त्यांना एक केलेच होते. अशातच त्यांचे प्रतिनिधित्व करणारा आश्वासक चेहरा म्हणून ज्या येडियुरप्पा यांना देशभरात ओळखले जाते, त्यांनी सदनामध्ये घोडेबाजार टाळत, राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी पुढच्या वेळी आपण किमान १५० जागांवर विजयी होऊनच येऊ, असा जो दावा केला आहे, तो शंभर टक्के खरा ठरणारा असाच आहे. जेडीएसच्या मरणपंथाला लागलेल्या कुडीत प्राण काँग्रेसने फुंकले आहेत. जेडीएसचा हाच भस्मासूर काँग्रेसला कर्नाटकातून संपवणारा आहे, हे मात्र तितकेच खरे.

संजीव ओक

संजीव ओक

राजकारणातील शुचिर्भूतता

संपूर्ण देश कर्नाटकातील विधानसौधमध्ये काय होते आहे, याचे थेट प्रक्षेपण पहात होता. १५ तारखेला विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यापासून तेथे काय होणार, याची देशभरातील नागरिकांना उत्सुकता होतीच, त्याशिवाय विरोधकांनाही होती.

संजीव ओक

Yeddyurappa sworn in as CM: Rahul Gandhi, Shah trade charges; highlights

BJP President Amit Shah on Thursday said democracy was murdered the moment “desperate” Congress made an “opportunist” offer to JD(S) to form the govt in Karnataka for “petty political gains”. 314 more words