Tags » Efforts

Pursuing Success

Every student dreams of the day they finally achieve their goals and become the person they have dreamt of, all their lives. They dream of the day when they are on stage in their graduation gown and caps, receiving the degree. 187 more words

Articles

From Finding Passion to Achieving Success

The Journey to Success Starts with Passion.

But,

What is passion? How do I find my passion? Will I achieve success through my passion? Will I make money through my passion? 2,098 more words

Efforts

Heidi Klum - Join @UNICEF and @rotaryinternational in their efforts to #e... Justin Tucker

All you need to do to get informed about all magazine news right away is to follow our lastoneminute.com site. You can find the details of the post titled Heidi Klum – Join @UNICEF and @rotaryinternational in their efforts to #e… in our article… 13 more words

Locks

Invisible ropes tying me tight

With no marks or scars left,

As an evidence of pain.

Just a constant touch

A not so gentle reminder…

109 more words
Emotions

४९२) अवलंबून असणे / गृहीत धरणे

            

४९२) अवलंबून असणे / गृहीत धरणे 

जीवन प्रवासात आपण कोणावर न कोणावर अवलंबून राहत असतो. लहानपणी प्रत्येक जणच अनेक गोष्टींसाठी आईवर अवलंबून असतो. आपण जस जसे मोठे होतो तेव्हा नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि मग आपण परत एकदा दुसऱ्या  नवीन व्यक्तीवर अवलंबून राहू लागतो. त्यांना गृहीत धरू लागतो.  उ.ह. शिक्षक, मित्र, सहकारी, शेजारी, नातेवाईक, बायको, मुले इत्यादी.

हळू हळू दुसऱ्यावर अवलंबून रहायची घातक सवय आपल्याला लागते. दुसऱ्याने ह्याबाबतीत हटकले तर आपल्या ह्या कृतीला प्रेमाचे नाव देऊन लटके समर्थन करतो. आपली हि सवय आपल्याला कमजोर बनवते. दुसरा माणूस ह्या सवयीचा  गैरफायदा घेतो आणि आपण काही करू शकत नाही. आपल्या शरीरावर  आणि बुद्धीवर  गंज धरतो. थोडक्यात अश्या वागण्याने आपले नुकसान हे ठरलेलेच  असते.

स्वत:ची बहुसंख्य कामे स्वत: करण्यातील मौज काही वेगळीच असते. एकदा समोरच्याला कळले कि आपले त्याच्या शिवाय अडत नाही, तेव्हा तो आपल्याला कधीच त्रास देण्याचा विचार करत नाही. स्वावलंबी माणसाच्या बोलण्याला किंमत असते व शब्दाला वजन असते.

दुसऱ्याला गृहीत धरण्याची सवय अनेक लोकांना असते, कारण त्यांना मी आणि माझे ह्यात जास्त रस असतो. इतर सर्व लोक हे केवळ आपल्याला सेवा देण्यासाठी आहेत, असा त्यांचा ग्रह असतो. मी गृहीत धरतो म्हणजे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असा युक्तिवादही केला जातो.

जेव्हा आपल्याला दुसऱ्याकडून गृहीत धरले जाते, तेव्हा आपण नेमके कसे वागतो ? असा विचार केला पाहिजे. असे झाले तर परिस्थितीत नक्की सुधारणा होईल.

बघा विचार करून. !!!

सुधीर वैद्य

१०१०२०१६

Spandane Articles

४९१) नशीब - कर्म :

४९१) नशीबकर्म :

माझ्या बालपणाने मला एक गोष्ट शिकवली. जन्म आपल्या हातात नाही, पण कसे जगावे हे तर आपल्या हातात आहे. वयाच्या आधी आणि लायकीपेक्षा जास्त काही मिळत नसत. आपण प्रामाणिकपणे काम करत राहायचे. देवावर श्रद्धा ठेवायची पण कर्मकांडात अडकायचे नाही. देवाकडे परिस्थितीशी झगडण्यासाठी बळ मागायचे. एवढे प्रयत्न करायचे कि नशिबाला हि यश देण्यावाचून पर्याय राहणार नाही. देवाकडे मागून मिळत नाही आणि              न मागताही देव दिल्याशिवाय रहात नाही, हा विश्वास मनी जपायचा.

कर्म करताना मनाचा आणि शरीराचा मेळ असला पाहिजे. ह्यालाच भगवत गीता ‘विकर्म’ म्हणते. कर्मात विकर्म ओतले कि अकर्म होते. याच अर्थ हा कि कर्म केल्यासारखेच वाटत नाही. त्यामुळे कर्माचा बोजा वाटत नाही. (अध्याय चौथा)

जन्म आपल्या हातात नसतो पण जगणे आपल्या हातात असते. कर्मावर विश्वास

ठेवून ध्येयाकडे वाटचाल केली, तर यश मिळवता येते. प्रयत्न आणि यश ह्यांची  भेट घडणे किंवा न घडणे हा नशिबाचा खेळ असतो.

आपण आयुष्यभर कर्म  करत असतो. काही कर्मे शारीरिक पातळीवर केली जातात तर काही वैचारिक पातळीवर घडत असतात. आपण जे करतो आहोत हे सुद्धा कर्म आहे हे  काही वेळा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. श्वास घेणे हे सुद्धा  कर्मच आहे. उ.हा. खरेतर श्वास घेणे ही शारीरिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे.

आयुष्यात मिळणारे फळ हे आपण केलेल्या कर्माशी  निगडित असते.

कर्माचे तीन प्रकार असतात.

१) क्रियमाण कर्म

२) संचित कर्म

३) प्रारब्ध कर्म

क्रियमाण कर्म

दिवसभरात आपण जी काही कर्मे करतो ती क्रियमाण कर्म ह्या प्रकारात मोडतात. माणसाला त्या कर्माचे फळ देऊनच ती शांत होतात. उ.हा. तहान लागली तर आपण पाणी पितो व पाणी पिऊन आपली तहान भागते / आपल्याला कर्माचे फळ मिळते.

संचित कर्म:

अनेक क्रियमाण कर्मांचे  फळ आपल्याला लगेच  मिळत नाही. फळ मिळण्यास कमी – अधिक वेळ लागतो. उ.हा परीक्षा झाली की लगेच फळ मिळत नाही. परीक्षेचा निकाल म्हणजे अभ्यास केल्याचे फळ.

फळ मिळण्यास काही वेळा काही वर्षे सुद्धा लागू शकतात. फळ मिळेपर्यंत ती संचित अवस्थेत  राहतात. उ.हा. राजा दशरथाचे पुत्र विरहाचे दु:ख.

) प्रारब्ध कर्म

काही वेळा क्रियमाण कर्माची फळे पुढील  जन्मी भोगावी  लागतात. उ.हा. धृतराष्ट्र

आधीच्या जन्मात पारधी होता. पक्षी पकडण्यासाठी त्याने एक वृक्षाला आग लावली, तेव्हा अनेक पक्षी आगीत होरपळून मेले. पुढील जन्मात त्याला १०० पुत्रांच्या वियोगाचे दु:ख भोगावे लागले. त्याच्या आयुष्याच्या  शेवट वनात लागलेल्या आगीत होरपळून झाला.

आपण जे सुख किंवा दु:ख भोगतो ते आपल्या पूर्व जन्मातील संचित असते.

सुखी राहायचे असेल तर आपण करीत असलेला कर्मावर लक्ष ठेवा. स्वधर्माची कास सोडू नका. आपल्या कर्मामुळे दुसऱ्यावर काय परिणाम होईल ह्याचा विचार करा. त्याला त्रास तर होणार नाही ना? ह्याचा विचार करा.

कर्माचे फळ मिळते पण फळाची आशा मनात धरून कर्म करू नका. माझ्या कर्माचे मिळालेले फळ मी भगवंताला अर्पण करणार आहे असा विचार मनात असेल, तर कर्माचा दर्जा नक्कीच चांगला राहील.

कर्माचा आनंद हा त्या कर्मामुळे मिळालेल्या फळांपेक्षा अधिक असतो हा अनुभव एकदा घ्याच.  तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल.

मित्रांनो, बघा विचार करून.

सुधीर वैद्य

०९१०२०१६

Life

SGInnovate launched to unify innovation efforts in Singapore

(Source: www.businesstimes.com.sg)

Deputy Prime Minister Tharman Shanmugaratnam at the opening of SGInnovate at 32 Carpenter Street. He says that Singapore can realise its full potential by bringing capabilities together in a new way. 529 more words

Money Matters