Tags » Forts Of India

The destroyer of time: A day at the fortress at Kalinjar

When people hear the mention of the UNESCO World Heritage Site, Khajuraho, their ears prick up with excitement. Oh, those temples? Erotica, ah ha! And they you give those looks, those nods, those smiles … a full-blown character analysis. 1,311 more words

Travel

How to go to Rajgad?

I woke up to the coolest breeze I had ever felt. It is normal on the mountain tops. It was 5 am, birds were already up and had started their routine. 439 more words

Ghosalgad or Virgad

घोसाळगड किंवा वीरगड. एक अपरिचित किल्ला जिथे जास्त कुणी कधी जात नाही. हा किल्ला जरी कुणी बांधला हे माहित नसले तरीही १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव घोसाळगड वरून वीरगड करण्यात आले असे म्हटले जाते. म्हणूनच हा किल्ला घोसाळगड किंवा वीरगड या नावानी हि ओळखला जातो. हा गिरिदुर्ग रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात घोसाळे गावी वसला आहे. कदाचित घोसाळे गावामुळेच किल्ल्याच नाव घोसाळगड पडल असाव. जवळपास हा किल्ला समुद्र सपाटीपासून २६० मी. उंचीवर वसला आहे. रोहा शहरापासून १० कि. मी. अंतरावर घोसाळगड गाव आहे. घोसाळगड ला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे रोहा – भालगाव – मुरुड – घोसाळे या मार्गाने तुम्ही घोसाळे गावी पोहचू शकता अथवा दुसरा म्हणजे इंदापूर – तळे – घोसाळे मार्गेही तुम्ही घोसाळेला पोहचू शकता. घोसाळे गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे.

घोसाळे गावात तेथील स्थानिक लोकांना विचारून गडावर जाता येते. गावातील भवानीमाता आणि नंतर गणेश मंदिर शेजारूनच या किल्ल्यासाठी पायवाट जाते. छोट्या झुडुपातून जाणारी हि पायवाट आपणास १५ मिनिटात किल्ल्याच्या पडक्या दरवाज्या समोर आणून सोडते. दरवाज्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर काही ठिकाणी आपणास दगडात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. त्या पायऱ्या चढून वर गेल्यास आपणास किल्ल्याच्या दरवाजाचे व डावीकडील बाजूच्या तटबंदी चे अवशेष पाहायला मिळतात. दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूना बसवण्यात आलेल्या शरब पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येतात. इतिहासात महत्व असणाऱ्या या शरब देखील किल्ल्याच्या इतर अवशेषांबरोबर किल्ल्यावर इतरस्त भग्नावस्तेत पडल्या आहेत. तिथेच आपणास खांब असणार पाण्याच टाक व चोर दरवाजा ही पाहता येतो.

आपण किल्ला डाव्या बाजूला ठेऊन उजव्या बाजूला असणाऱ्या माचीवर चक्कर मारून येऊ शकतो. माचीची तटबंदी अजून हि चांगल्या स्थितीत आहे. माचीवर आपणास भगवा ध्वज हि पाहण्यास मिळतो. तेथून पुढे आपण माचीस पाठ करून पुन्हा घोसाळगडाच्या वरच्या भागात जाणाऱ्या पायऱ्याच्या मदतीने वर जावे. थोड्या पायरया चढल्यावर आपणास किल्ल्याच्या डाव्या व उजव्या बाजूस जाणाऱ्या दोन कच्च्या पायवाटा नजरेस पडतात. आपण उजव्या बाजूस असणारी दोन पाण्याची टाकी पाहून किल्ल्याच्या वरच्या बाजूस चालत राहावे. काही अंतर चालल्यावर आपणास गडाच्या एकदम कढेवर व सहजासहजी न दिसणार खांब टाक पाहण्याजोग आहे. त्याच्याच शेजारी एक भल मोठ पाण्याच टाक मातीने पूर्णपणे मुजलेल्या अवस्थेत आपणास पाहण्यास मिळत. त्याच रस्ताने सरळ जाताना आपणास रस्तात चौकोनी दगडात कोरलेले शिवलिंग पाहण्यास मिळते.

किल्ल्याच्या डाव्याबाजुने आपण सरळ पुढे आल्यास आपण किल्ल्याच्या मागील बाजूस पोहचतो. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी कातीव कड्यांचा उंचवटा आहे. या गडमाथ्यावर जाणे खूप कसरीतीचे काम आहे. पण तिथे न जाता हि गड प्रदक्षिणा करता येते. तिथेच गडाच्या मागील बाजूस आपणास भग्नावस्तेत पडलेली तोफ हि दिसते. तोफ पाहून गडाच्या उजव्या बाजूने चालत राहावे. बराच चालल्यावर आपणास एक इमारत व काही जोती नजरेस पडतात. ते पाहून आपण पुढे आल्यावर आपणास भल मोठ पाण्याच टाक दिसत.

किल्ल्याला संपूर्ण एक चक्कर मारून आल्यावर आपल्या गड भ्रमंतीचा शेवट होतो तो किल्ल्याच्या डाव्याबाजूस असणाऱ्या खोदीव दगडी पाण्याच्या टाक्यांकडे. किल्ल्यावरील सुरुवातीला रस्त्यात लागलेली आणि आताची हि टाकी या दोन्हींमधील पाणीच पिण्यायोग्य आहे. त्याचप्रमाणे या पाण्याच्या टाक्यावर दगडात कोरलेली प्राण्यांची चित्रे देखील पाहण्याजोगी आहेत. त्यामध्ये दोन हत्ती व हरीण यांची चित्रे आहेत. अश्याप्रकारे गड भ्रमंतीस आपणास जवळपास एक तास तरी लागतो.

किल्ल्यावरून आपणास तळागड नजरेस पडतो. त्याचप्रमाणे घोसाळगड वरून जवळच असणारी मांदाडची खाडी हि पाहता येते. गडावर वर नमूद केल्याप्रमाणे पाण्याची टाकी व तटबंदी सोडली तर अजून काहीही अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्यावर पहिल्यांदा असणारी भवानी मातेची मूर्ती आज गावातील मंदिरात आपणास पहावयास मिळते. किल्ल्यावर राहायची व जेवणाची सोय नाही. परंतु काही ठराविक वेळेला किल्ल्यावर पिण्यायोग्य पाण्याची सोय होऊ शकते.

हे पाहून आपण आल्या मार्गाने पुन्हा किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहचतो. परत तीच वाट पकडून आपण घोसाळे गावात पोहचतो. घोसाळे गावात एका ठिकाणी एक मंदिराचा खांब रस्त्याच्या बाजूला उभा केलेला दिसतो. त्यावर केल्या गेलेल्या कलाकुसरीवरून तो प्राचीन असल्याची शक्यता जाणवते. त्याचबरोबर एका मंदिरात एक प्राचीन शिलालेख हि पाहावयास मिळतो.

जर स्वताचे वाहन असेल तर आपण योग्य नियोजनाद्वारे घोसाळगडासोबत, बिरवाडी, तळागड, अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहू शकतो.

अभिषेक नार्वेकर
पुणे – १४/०९/२०१३
abhi.narvekar01@gmail.com

Forts Of India

Hampi: Story of A Ruined Citadel - Part 1

A huge circular, open-air venue with raised sitting and full of audiences roaring like anything on an occasion of a gladiator combat. Roman Empire, a civilization that conquered a vast stretch of land. 3,979 more words

All Posts

Hampi: Story of A Ruined Citadel - Part 1

A huge circular, open-air venue with raised sitting and full of audiences roaring like anything on an occasion of a gladiator combat. Roman Empire, a civilization that conquered a vast stretch of land. 3,979 more words

All Posts

Top 5 Forts To Visit In India

The country, India has really a rich cultural heritage within and beautiful ancient history, and there couldn’t be a better way to experience its imperial lineage than to visit or experience the most majestic palaces and amazing top ancient forts in India. 577 more words

Travel