Tags » Genetic » Page 2

My Short Story

Hey there!!

So my story…shortened.  I’m 33 years old. When I was 21ish…I found out why so many people on my Momma’s side of the family have died from cancer. 176 more words

#cancer

Drosophila help researchers understand rare genetic disorder

Barth Syndrome is a rare genetic disorder that affects mainly males. It is characterized by impaired lipid metabolism, muscle weakness, growth delays, cardiomyopathy, and low numbers of neutrophils in the blood, which renders patients with the condition more susceptible to infections. 303 more words

Comparative Physiology

गुलाब

खरंतर निसर्ग हा अद्वितीय कलाकार आहे. तो प्रत्येकाला त्याला हवं तसं घडायची, हवं तसं बनायची संधी देत असतो. पण हे सगळं त्याच्या दिलेल्या चौकटीत, उपलब्ध परिस्थितीत, उपलब्ध संधीमध्ये घडून जायला हवं. गुणसूत्रातील योगायोग घडल्यानंतर जो काही नवा गुणसूत्र समूह तयार होईल तो घेऊन दिलेल्या पतिस्थतीत जर टिकाव लागत असेल तर यो गुणसूत्र समूह विजयी ठरतो आणि त्याची पुढच्या दिशेने वाटचाल सुरू होते ती पुन्हा काही योगायोग घडून नवीनच गुणसूत्र समुह तयार होई पर्यंत म्हणजेच नवीन स्पेसी जन्माला येईपर्यंत.

अशाच अनेक संधी एका फूल प्रकाराला मिळाल्या आणि त्याने त्याची विविधता एवढी विलक्षण वाढवत नेली की बस. आणि त्यानंतर त्या फुलाच्या प्रेमात (प्रेमाचे फुल म्हणूनही असेल कदाचित) पडलेल्या माणसाने अनेक प्रयोग करून, वेगवेगळ्या भवतालात याची लागवड करून हो विविधता जपली, वाढवली. आणि हे फुल म्हणजे गुलाब. अनेक रंग, अनेक आकार, अनेक छटा अशा अगणित प्रकारात भेटणारा गुलाब नेहमीच मनाला सुखावत असतो.

गुलाब हा मला नेहमी आदर्शवत वाटत आला आहे. म्हणजे तो स्वतःच्या रंग रूपाने दुसऱ्यांना उल्हास देत असतोच. परंतु त्याच्या सुगंधानेही तो दुसऱ्यांच्या हृदयाचा ठाव घेत असतो. परंतु म्हणून कोणी त्याची छेड काढायला गेलं तर मात्र त्याचे काटे तो लक्षात आणून देईल. म्हणजे एखादा माणूस स्वतःच्या व्यक्तित्वामुळे दुसऱ्याला आनंद देत असतो. त्याच्या संपर्कात आपल्याला आश्वस्त वाटतं, आल्हाददायक वाटतं. तर अशा व्यक्तीमध्ये जर अनुकंपा असेल, सहृदयता असेल तर ती व्यक्ती अजूनच प्रिय असते. परंतु जर तुम्ही आशा व्यक्तीचा गैरफायदा घ्यायला गेलात तर ती तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. हे म्हणजे संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे “मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे” असंच झालं ना?

आता गुलाबकडून कोणी काय घ्यावं ते ज्याचे त्याने ठरवावे पण या जीवन (आब) फुलाकडे (गुल) देण्यासारखं अगणित आहे हे नक्की.

– मनीष
17 फेब्रुवारी 2018