Tags » Independence Day

INDEPENDENCE DAY CELEBRATION BY MUMBAI HARMONICS

“Mumbai Harmonics” is a musical group formed in October 2014 by four passionate Harmonica (Mouth Organ) lovers within the precincts of the drawing room of one of the member’s flat in Hanging Gardens (Mumbai).  409 more words

Bollywood

निसर्गाचा स्वातंत्र्यदिन

सकाळी अंमळ उशीराच जाग आली. पडल्या पडल्या खिडकीतून दिसणारा बाहेरचा ओलावा पाहत एका हातावर डोकं ठेऊन बराच वेळ पडून राहिले. उठले आणि पावसाने फुगलेलं लाकडी दार खेचून पूर्ण उघडलं. रात्रभर पडलेल्या रिमझिम पावसाने झाडांची पानं नुकतीच आंघोळ केलेल्या आणि आल्या केसांवरुन निथळणाऱ्या थेंबांनी किंचित भिजलेल्या एखाद्या तरुणीसारखी तजेलदार दिसत होती. मी उठले तरी निसर्ग अजूनही धुक्याच्या दुलईतून बाहेर येईना.
पावसाचे थेंब मोठ्या झाडावरुन खालच्या छोट्या छोट्या झाडांवर क्रमाक्रमाने पडत होते. नजरेसमोरच्या झाडांची पानं एखाद्या कुशल बोटांनी पियानोच्या बटनांवर अलगद दाब द्यावा अशी हलत होती. आता हे पान हललं, तर आता ते, मध्येच वाऱ्याने ही क्रमाक्रमाने होणारी हालचाल एका झटक्यात उधळून स्वतःची वेगळीच धुन तयार केली.
दाट जंगलातून येणारा समुद्राच्या गाजेसारखा वाऱ्याचा आवाज, त्यामागोमाग पानांची सळसळ, थेंबांचा टपटपटप आवाज, त्यात निळ्या कस्तूर पक्षाची हुबेहूब माणसासारखी शिळ….!
व्हरांड्यातल्या खुर्चीवर बसकण मारत समोर सुरू असलेली निसर्गाची ही मेलडी पाहत आणि ऐकत होते. यात किती वेळ गेला काही कल्पना नाही.
मोबाईल नेटवर्क आणि लोकवस्तीला मागे टाकून इथे आले त्याला २ दिवस झाले. जखडून टाकणाऱ्या प्रत्येक गोष्टी उदाहरणार्थ घड्याळ आणि मोबाईल ट्रेकींगच्या बॅगेत कुठेतरी अनंतात हरवून टाकल्या होत्या. इथे फक्त पाऊस, झाडांची दाटीवाटी आणि खुर्चीत बसलेली मी.

इतक्यात आमच्यातल्या उत्साही कार्यकर्त्याने रेडिओ लावला. या गावात रेडिओलाच फक्त नेटवर्क असल्याने रात्रीच्या अंधारात बेडकांच्या डराव, डराव आणि रातकीड्यांच्या किर्रर्रर्र किर्रर्रर्र च्या आवाजात मंद असा हा रेडिओ तेवढा चालत होता. तर सकाळी उठल्या उठल्या पठ्ठ्याने रेडिओ लावला. “जयोस्तुते जयोस्तुते” सुरू झालं आणि डोकं खाजवत मी मनाशीच बोलले, “अरेच्चा, आज तर १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन.” आकाशवाणीवर एकापेक्षा एक देशभक्तीपर गीतं सुूरू झाली. या गाण्यांचा परिणाम आमच्या मित्रावर इतका झाला की उठून सरळ त्याने ड्रॉव्हरमध्ये शोधाशोध सुरू केली. त्याच्या वडिलांनी मुख्याध्यापक असताना शाळेत लावण्यासाठी म्हणून कापडाचा झेंडा बनवून घेतला होता. तो झेंडा पठ्ठ्याने शोधून काढला आणि रितसर काठी वगैरे आणून घराच्या एका खांबाला अडकवला सुद्धा विशेषतः हे सगळं त्याने शब्दही न उच्चारता अत्यंत शांतपणे केलं. तिसरा अजूनही अंरुणातच होता. राष्ट्रगीत नाही की झेंडावंदन नाही पण त्याने काहीच फरक पडला नाही. आम्ही आपापल्या परीने देशसेवा करतोच मग आजच देशभक्तीचा कांगावा कशाला करा. असो.
तर रेडिओमुळे आम्हाला देशभक्त असल्याची जाणीव झाली हे मात्र नक्की, आकाशवाणीकडे देशभक्तीपर गाण्यांचं असलेलं कलेक्शन संपल्यानंतर त्यांनी थेट सलिल कुलकर्णीची गाणी सुरू केली आणि आमचा वैताग झाला. (सलिल कुलकर्णीची गाणी यावर टीकाही होऊ शकत नाही इतकी बथ्थड आहेत.)
स्टेशन बदलून आम्ही एफएमवर आलो. तिथे तर हिंदी देशभक्तीपर गाण्यांचा त्सुनामी आला होता. स्वदेस म्हणू नका, भगतसिंग म्हणू नका, बॉर्डर म्हणू नका की रंग दे बसंती म्हणू नका वेगवेगळ्या काळात आलेल्या देशभक्तीची भारुडं गाणाऱ्या चित्रपटांच्या गाण्यांचा रतीब होता. ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्याने आम्ही रेडिओची सांगता केली. गाणी थांबली पन मन बोलू लागलं…


माझा देश ७० वर्षांचा आजोबा झाला खरा पण त्याची स्थिती वेंटिलेटरवर असलेल्या ९९ वर्षांच्या म्हाताऱ्यासारखी झालीये असं वाटलं. या देशात ६० कोवळी मुलं केवळ ऑक्सिजन सिलेंडर नाहीत म्हणून तडफडून मरतात, या देशात काळाबाजार रोखण्यासाठी डिमॉनिटायजेशन केलं म्हणून भ्रष्टाचारी मालकांनी अनेक हाताखालच्या कामगारांना रोख रक्कम देऊन स्वतःचा काळा पैसा पांढरा केला. आंदोलन करणाऱ्यांच्या वतीने सत्तेला ठणकावून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना स्वतःच्या कार्यालयात एडीटर आणि बॉसला मात्र का? असं विचारण्याची मुभा नाही. सत्तेच्या आणि व्यापाऱ्यांच्या आधीन झालेल्या मिडीयात पत्रकार केवळ सांगकाम्या झाला. या देशात बलात्काराच्या संख्येत वाढ झाली आणि मुलींच्या वयात घट झाली. ७० वर्ष झाली तरी बाईकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन जराही बदलेला नाही. ज्यांच्यामुळे इतिहासाला सौंदर्य आणि वीररसाची छटा मिळाली त्या मुघलांनाच इतिहासातून तडीपार केलं जातंय. विविधतेने नटलेल्या या देशात जातीपाती आणि धर्माच्या भिंती अधिकच बळकट होत चालल्या आहेत. ‘गोवंशहत्याबंदी’ अशा धमकीवजा चेतावनीचे पाईक विशिष्ट समाजातल्या कित्येकजणांना हलाल करत सुटले आहेत.
विचारांनी डोक्यात मुंग्या झाल्या. काही क्षण कान घट्ट बंद केले आणि पुन्हा मन ताळ्यावर आणत या वाईट सत्यामधून निसर्गाच्या सौंदर्याकडे लक्ष केंद्रीत केलं.


स्वातंत्र्य म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर निसर्गाकडे पहावं. ज्या जमिनीत हिरवीगार झाडंझुडपं येतात त्याच्याच शेजारी काटेरी झुडूपही गुण्यागोविंदानं नांदतं. अनेक झाडांना लगडलेल्या विविध प्रकारच्या विविध जातींच्या वेली पाहिल्या की विविधतेतील एकता काय चीज आहे ते कळून चुकतं. एकमेकांना साद घालत झाडाझाडांवर बसलेले तऱ्हेतऱ्हेचे पक्षी आपल्याला बंधुभाव शिकवतात.
निसर्ग गात असलेलं गीत ऐकत असतानाच पत्र्यावरून एक माकड हलकेच डोकावलं. मिळेल ते तोंडात कोंबण्यासाठी नासधुस करत गावभर हिंडणाऱ्या या माकडाला पाहुन हसत म्हटलं, “तू तरी माणसासारखं वागू नकोस.”

#वेडीबाभळ

Poems

No country called home

If anything, history teaches that borders are impermanent, as are nationalities (Cosmopolis column published in The Hindu Business Line, August 12, 2017)

As India turns 70, it can be illuminating to remember that so many other nations never got this far. 869 more words

Kanishk Tharoor

Day 13 (18th August 2017): Observing English Class

Hello (again) Lampang! Finally after 12 hours, I arrived at Nakhon Lampang Railway Station around 10.30 am. Me, Silmi, Annisa, and Fitri were very tired and hungry. 266 more words

Independence Day Celebrations

KV Ernakulam showed no less enthusiasm in celebrating the 70 th Independence Day of our Motherland. With more vigour every passing year, children stood up with gleaming eyes and respect for the flag hoisting ceremony.It was followed by Patriotic song competition and then, children rose to the speeches delivered by the august gathering on the dice. 15 more words

Events

Doijee Amma, 80, takes great pride in being Messiah to Labour Class

Revolution has no name , class, gender or sect. It is about fighting the odds no matter what, and fostering change. This is exactly what Doijee Amma’s life is all about. 593 more words

Newsy Takes