Tags » India

Day 173 to 178 - Champawat to Pokhara, Nepal

An easy ride to finsih off my first stint in India, down out of the hills from Champawat and into Nepal. The road wound down steadily along the side of the hills, giving some more incredible views all the way, though a little different this time. 3,477 more words

Ride Reports

DIARY OF THE ALMOST NEXT-TO-THE-LAST DAY OF A LONG TRIP

Still November 24, 2017I am bone-tired this morning. Almost frighteningly tired. I’ve made myself get up, shower and walk around for strong coffee and photo ops. 1,694 more words

AROUND THE WORLD

साल्हेर भटकंती

खूप दिवस झाले होते कुठे जाण्याचा योग आलाच नव्हता,कामाच्या व्यस्तपणामुळे तसं मला जमल नाहीच,पण ह्यावेळी मी ठरवलं होत कि काहीही करून मी जाणार,कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरायची सवय झाल्याअसल्यामुळे ऑफिसात जास्त वेळ तग धरून नाही राहू शकत.शेवटी आम्ही म्हणजेच सुशील आणि मी नाशिकला म्हणजेच महाराष्ट्रातल्या सर्वात उंच साल्हेर किल्ल्यावर जाण्याचे ठरवले.मग काय आम्ही दरवेळचे ठरलेले भटके म्हणजेच मी,सुशील,चेतन आणि जयेश,रजनीश,आशिष,कमलेश सोबतीला आमचा आवडता महेश भाऊ.कारण ह्या महेश भाऊला कधीही आवाज द्या तो लगेच आपली गाडी घेऊन तयार असतोच.

शेवटी आम्ही सह्याद्रीचे पावसाळ्यानंतरचे रूप पाहायला दिनांक १९ नोव्हेंबर शनिवार रात्री आम्ही सगळे जण गांधीनगरला जमून किल्ले साल्हेरच्या दिशेने गाडी पळवली.तसा थंडीचा महिना चालू असल्याकारणामुळे सगळ्यांकडे थंडीचे स्वेटर होते असे मला वाटले पण एकाकडेही स्वेटर नव्हता.बाहेर तर धुक्याचे प्रमाण थोडे कमीच होते.काही तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका ठिकाणी चहा साठी थांबून चहा ढोसून आम्ही परत साल्हेरच्या दिशेने रवाना झालो.हवेत गारवा असल्याकारणामुळे सगळे गाडीत झोपी गेले.काही तासातच आम्ही साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला म्हणजेच साल्हेर वाडीत येऊन पोचलो.काही माणसांची अजून झोप पण पूर्ण झाली नव्हती.अजूनही सह्याद्री जागी झाली नव्हती,आता सर्वजणांनी साल्हेर किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेवरून वाट पकडली.

समोरच दिसणारा साल्हेर किल्ला खूपच विलक्षण वाटत होता.जणू त्याचा कातळकडा अंगावर येत असल्याचा भास करत होता.काही मिनिटातच आम्ही कोरीव पायऱ्यांजवळ येऊन पोचलो होतो.सूर्यनारायणाने डोके हळू हळू वरती काढायला सुरुवात केली होती.पाऊस संपल्या असल्याकारणाने सह्याद्रीत खूपच काही बदल झाले होते.दोन ते चार महिन्याचा मुसळधार पाऊस ह्या सह्याद्रीने अनुभवला होता.काही वेळ तिथेच थांबून थोडी फोटोग्राफी करून आम्ही पुढे म्हणजेच पहिल्या दरवाज्याच्या दिशेने चालू लागलो.आम्ही म्हणजे महेश,कमलेश,रजनीश आणि आशिष आम्ही पायऱ्यांच्या दिशेने चालू लागलो.तोपर्यन्त राहिलेली आमचे मित्र म्हणजेच सुशील,चेतन,आणि जयेश एका कड्याच्या साह्याने वरती येण्याचा प्रयत्न करत होते.पण त्यातील दोघा जणांना म्हणजेच सुशील आणि चेतनला कडा चढायला सुरुवात केली.दोघांनी कडा चढला पण जयेश काही तो कडा चढता आला नाही.त्यामुळे परत तो पायऱ्यांच्या वाटेने परत आला.

पहिला दरवाजा

काही वेळातच आम्ही पहिल्या दरवाज्याच्या इथे येऊन पोचलो.दरवाजा अजूनही चांगल्या सुस्थित आहे.पहिला दरवाजा ओलांडून लगेच दुसरा मोठा दरवाजा लागतो.त्या दरवाज्याच्या कमानीवर शिलालेख कोरलेला आढळतो.

तिथेच त्या दरवाज्याजवळ थोडा आराम करून आम्ही पुढे चालायला सुरुवात केली.त्यानंतर परत एक पठार पार करून उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांजवळ पोचलो.

त्या पायऱ्या चढल्यानंतर लगेच एका दरवाजाच्या कमानीतून आपल्या हाताच्या डाव्या बाजूने चालत जाऊन परत एक दरवाजा लागतो.अजून एका दरवाज्याने वरती चढून आम्ही आता एका पठारावर पोचलो.

तिथूनच साल्हेरचा उतुंग असा अवाढव्य असा पण तितकाच मृदू असा कातळकडा दिसू लागला.त्यावरती उन्हाने सुकलेल गवत होते.सूर्याच्या किरणाने ते अजून सोनेरी वाटत होते.तसाच आम्ही पुढे पठारावरून चालत जाऊन एका लांबलचक अशा टाक्याजवळ पोचलो.टाक्याचे पाणी हिरवेगार झाले होते.तसाच पुठे चालून गेल्यावर काही मिनिटातच आम्ही यज्ञ कुंडाच्या बाजूने चालत आपल्या हाताच्या हाताच्या डाव्या बाजूला खूपच मोठा असा हिरवागार पाणी असलेला गंगासागर तलाव नजरेस पडला.अजूनही त्याचे बांधकाम बघण्यासारखे आहे.तिथूनच थोडे पुढे चालत गेल्यावर तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे मंदिर आणि छपरं नसलेले गणपतीचे मंदिर दिसले .त्यांना मनोमन नमस्कार करून आम्ही आता वरच्या बाजूने म्हणजेच परशुरामाच्या मंदिराच्या दिशेने चालू लागलो.काही वेळातच आम्ही गुहेजवळ जाऊन पोचलो.त्यात तीन गुहा आहे.त्याच गुहेमध्ये मारुती रायाचे मंदिर सुद्धा आहे.काहीवेळ तिथेच पोटपूजा करून आम्ही गुहेच्या वरच्या बाजूने खडी चढाई चालू करण्यास सुरुवात केली.

पाऊस संपल्या असल्याकारणाने त्याच्या वाटेवर चालणं आता अवघड झालं होत.पूर्ण मातीने भरलेली पायवाट आता दगडाने माखली होती.पूर्ण छोटे मोठे दगड त्या पायवाटेवर आले होते.त्यामुळे ती वाट घसरडी झाली होती.काही वेळातच आम्ही त्या घसरड्या वाटेवरून आम्ही परशुराम मंदिराजवळ पोचलो.

परशुराम मंदिर

सगळ्यात प्रथम मी व त्यानंतर महेश हि लगोलग माझ्या पाठी आला.आम्ही दोघांनी परशुरामाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर बाकीची मंडळी वरती आली.परशुरामाच्या मंदिराच्या बाहेरच्या फरशीवर काही मजनू काही प्रेमी युगुलांची नवे ऑइल पेंटने रंगवली होती.म्हणजे बघा ना एवढ्या वरती हे लोक हेच बघायला येतात का.काही ट्रेकर्स मंडळी सर्व गडकिल्ल्यांची निगा राखत आहेत आणि हेच अडाणी प्रेमी अशी गडकिल्ल्यानवरती आपली नावे लिहत आहेत.कधी येणार अक्कल ह्या लोकांना ह्यांना काय माहित.सगळ्यांनी दर्शन घेऊन तिथेच काही वेळ आराम करून काही फोटोस काढून आम्ही आता परतीच्या वाटेला लागलो.

परशुराम मंदिर

काही तासातच आम्ही परत त्याच वाटेवरून साल्हेरवाडीत येऊन पोचलो.आता मात्र ऊन वाढले होते पण हवेत गारवा जाणवत होता.काही वेळातच आम्ही तिथून निघून आता काही तासानंतर एका हॉटेल जवळ जेवायला थांबलो.त्यांनतर मस्त पैकी सगळ्याजनांनी शाकाहारी व मासांहारी जेवणावर यच्छेद ताव मारून बाजूलाच असलेल्या पेरू विकणाऱ्या मुलीकडून पेरू घेऊन परत गाडीत बसून मुंबईकडे रवाना झालो.काही तासातच गाडीत बसलेले सगळे दमले असल्याकारणामुळे लगेच झोपी गेले.

साल्हेर किल्ला जितका कणखर आहे तितकाच मृदू आहे,त्यात केलेल्या खोदकामामुळॆ हे समजून येतेच.एवढ्या अवाढव्य कातळकड्याला पोखरून काढून त्यात दरवाजे पायऱ्यांची रचना करणे हे काही असामान्य काम नाही.त्यावरती बांधले गेलेले परशुरामाचे मंदिर अतिशय सुंदर आहे.त्यावरून दिसणारे सह्याद्रीचे रूप मन मोहून टाकणारे आहे.समोरच उभा ठाकलेला सालोटा किल्ला त्याला जणू काही संरक्षण देत असल्याची जाणीव करून देत असतो.साल्हेर किल्ल्याच्या बाजूने जणू काही किल्ल्यांची सरंक्षण भिंतच उभी राहिली आहे.समोर दक्षिण बाजूला अजंठा – सातमाळा डोंगरातले धोडप, इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगीतुंगी, तांबोळया, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.

खरंच ह्या वेळी साल्हेर किल्ल्याने मनाला शांती दिली,शहराच्या दगदगीपासून खूपच जरा लांब म्हणजेच साल्हेर किल्ल्यावर आल्यावर मनाचा तसेच अंगाचा ताण दूर झाला.

ट्रेकिंग

Mhysa Grills and Rolls

Mhysa is a small eatery  located opposite to Phoenix Market City. It often goes unnoticed , but their rolls and grills are something you’d want to remember.  111 more words

Chennai

Shrine For Girls - Patricia Cronin

Within Venice’s historic sixteenth-century Chiesa di San Gallo, New York-based visual artist Patricia Cronin created a shrine that paid homage to the abundance of women and girls around the world who face violence, repression, and enforced ignorance… 431 more words

Western Art

The New Indian Express: Beware of radicalization campaigns on social media, Punjab CM Amarinder Singh tells police

The New Indian Express: Beware of radicalization campaigns on social media, Punjab CM Amarinder Singh tells police. “With the recent busting of a terror module operating in Punjab having links to other countries, Chief Minister Amarinder Singh on Friday directed the state police to be vigilant against radicalization campaigns being carried out on various social media platforms such as Facebook.”

Around The Search & Social Media World

An Interview Of Santosh Krinsky.

By Jerry Alatalo

r. Santosh Krinsky, editor of Sri Aurobindo Studies here at WordPress, has kindly given a positive response to our invitation to participate in an interview. 847 more words

War And Peace