Tags » Mountains

Special Sort of Parachute

What I want to say here today is about how we build towns in low places.
Now I don’t mean lowly, or head stooped, or humbled. 322 more words

लडाख....पर्वतांच्या देशात

लेह एअरपोर्टवर उतरले आणि सभोवताली शिस्तशीर रांगेत सावधानमध्ये उभ्या असणाऱ्या अवाढव्य डोंगरांनी आम्हाला कडक सलामी दिली. ऊन–सावलीचा खेळ खेळणारे डोंगर, काचेसारखं स्वच्छ वातावरण, चपट्या नाकाची, मिचमिच्या डोळ्यांची बुटकी लडाखी माणसं….. लडाखने पहिल्या नजरेतच पुरतं जिंकून घेतलं.

लडाख टूरिजम म्हटलं की काही ठराविक गोष्टी पाहण्याकडे, करण्याकडे पर्यटकांचा ओढा असतो. फोटोग्राफी आणि बुलेट चालवणं यापलिकडचं लडाखी माणसाचं आयुष्य जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. लेहमध्ये उतरल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला माऊंटन सिकनेसचा सामना करावा लागतो. ट्रीपचा पहिलाच दिवस आरामाचा हे समीकरण काहीसं विचित्र वाटत असलं तरी ते त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचं असतं. एअरपोर्टबाहेर दोरजी आणि त्याची मोठी टेम्पो ट्रॅव्हलर आमची वाटच पाहत होते. आर्मीच्या गाड्या चालवण्याचं काम केलेला दोरजी आम्हाला लडाख फिरवून दाखवणार होता. लेहमध्ये फिरण्यासाठी लागणाऱ्या गाड्यांचे रेट्स किलोमीटरप्रमाणे ठरलेले आहेत. त्यांच्या युनियनचं रेटकार्ड लेहमधल्या प्रत्येक टूरिस्ट गाड्यांच्या मालकांकडे असतं. दोरजीबरोबर पुढच्या १५ दिवसांचं प्लॅनिंग केलं. लेह, कारगिल, द्रास, पॅनगॉंग लेक, त्सो मोरोरी लेक, वाटेत येणाऱ्या मॉनिस्ट्रीज असा भरगच्च कार्यक्रम आखला होता.

लडाखमधल्या पर्वतरांगा हे लडाखची ओळख आहे. फोटोग्राफीचं कोणतंही तंत्र अवगत नसणाऱ्यानेही काढलेले फोटो अप्रतिम येतात. लेह लडाखने मला फोटोत न सामावलेलं नयनसुख दिलंय. एखाद्या ग्रहावर आलो आहोत असा फील लडाखमध्ये फिरताना हमखास येतो. दूरपर्यंत नजर जाईल तिथे वेगवेगळ्या रंगाचे मातीचे आणि दगडांचे अवाढव्य पर्वत, एकही झाड नाही की झुडूप नाही. निळ्या स्वच्छ आकाशाच्या कॅनव्हासवर पांढरे ढग पकडापकडी खेळताना दिसले. आकाशात पक्ष्यांची मात्र कमतरता होती. पर्वतरांगांना वळसे घालून जाणारा काळ्या डांबराचा रस्ता म्हणजेच NH1 हीच काय ती मानवी खुण. वाऱ्याचा आवाजही ऐकू येईल इतकी शांतता. दाटीवाटीच्या पर्वतरागांमध्ये सुस्तपणे पहुडलेल्या काळ्या डांबरी रस्त्यांवर बुलेट चालवण्याचा अनुभवही घेतला. लडाखच्या थंड आणि कोरड्या वातावरणाने मनाला ओलावा देणारे अनेक क्षण दिले.

कारगिल युद्धाचे अवशेष

आर्मीच्या गाड्या चालवल्यामुळे लडाखमध्ये असे कोणतेही रस्ते उरले नव्हते जिथे दोरजीच्या गाडीचे टायरमार्क्स उमटले नव्हते. त्यामुळे गाडी चालवताना त्याच्या तोंडाचा पट्टाही सुरू असायचा. ”यहा पे बंकर लगाया था”… ”इशसे थोडा आगे लडाख स्काऊट का बेस कॅम्प हे जहा मै काम करता था.” अशी त्याच्या लडाखी उच्चारातल्या हिंदीत रनिंग कॉमेंट्री सुरू असायची. सकाळी लवकर कारगिलसाठी रवाना झालो. ९९ च्या भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या आणि तेव्हापासून युद्धाच्या छायेत वावरणाऱ्या कारगिलला भेट देण्याची उत्सुकता होतीच. कारगिलपासून 60 किलोमीटरवर असलेल्या ‘द्रास‘ ला कारगिलचं युद्ध झालं होतं. तिथे असलेल्या वॉर मेमोरियलमध्ये अंगावर काटा आणणाऱ्या घटनांचे फोटो, वस्तू यांचं संग्रहालय आहे. टायगर हिलपर्यंत आलेल्या पाकिस्तानी सैन्याला मागे सारण्यासाठी द्रासच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैन्य उभे ठाकले होते. युद्धाच्या रम्य कथांमागे असलेल्या माणसांचं माणूसपण दाखवणारी एक महत्त्वाची गोष्टं त्या संग्रहालयात होती ती म्हणजे युद्धभूमीवरील सैनिकाने आपल्या कमांडरला लिहलेली पत्रं.

”काल सात ऑफिसर्स युद्ध भूमीवर गेले होते त्यातले फक्त तीनच परत आले.” त्या पत्रातली ही वाक्य अंगावर शहारा आणतात. अशाच काही पत्रांचा ठेवा लेहमधल्या वॉर मेमोरियलमध्येसुद्धा आहे. तिथे तर महिनोनमहिने घरादारापासून दूर राहिलेल्या आणि युद्धभूमीवर शहीद झालेल्या सैनिकांनी आपल्या घरच्यांना लिहलेली पत्रं आहेत. ही पत्रं वाचताना डोळ्यांत पाणी साठतं. २० ते ३० वयोगटांतले हे तरूण सैनिक देशासाठी शहीद होतात. आपल्यासारख्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी नेमकी काय किंमत मोजलीये याची जाणीव त्या पत्रांतल्या शब्दाशब्दांतून येते.

भारत–पाकिस्तान उंबरठ्यावरचं शेवटचं गाव

तुरतुक हे भारत आणि पाकिस्तानच्या उंबरठ्यावरचं शेवटचं गाव. इथून पाकिस्तानचं अंतर २० किलोमीटरपेक्षाही कमी आहे. एक पाय पाकिस्तानात एक पाय भारतात असलेलं हे गाव १९७१ ला भारताच्या ताब्यात आलं. एका सकाळी अचानक इथल्या गावकऱ्यांना तुम्ही आजपासून भारतीय झालात असं सांगण्यात आलं. आजही तुरतुकमधल्या प्रत्येकाचे नातेवाईक शेजारच्या म्हणजेच आज पाकिस्तानात असलेल्या गावांत आहेत. कोणाची आई आहे तर कोणीची लग्न करून दिलेली मुलगी. १९७१ पासून या गावातलं कोणीही त्या गावात जाऊ शकलेलं नाही की त्या गावातून कोणी या गावात येऊ शकलेलं नाही. तुरतुक हे बाल्ती मुस्लीम लोकांचं छोटंसं गाव आहे. इथल्या शाळांमध्ये उर्दू, अरबी आणि इंग्रजी या भाषा शिकवल्या जातात. सकाळी एकच बस डिस्कीट या मोठ्या गावाकडून तुरतुकला जाते. डिस्कीट मॉनेस्ट्री ते तुरतुक या रस्त्यावर अभावानेच एखादा मिलिट्री ट्रक दिसतो. ही बस हाच काय तो या १०० किलोमीटरच्या प्रवासातला इथून तिथे जाणारा दुवा. बाकी अचल पर्वतांसारखीच इथली गावंही स्तब्ध…! शेजारी रों रों करत वाहणाऱ्या श्योक नदीचा घाबरवणारा वेग आणि बोडक्या पर्वतरांगा यांच्यामध्ये सुस्त पडलेला रस्ता. तुरतुक हे गाव दोन महिन्यांपुर्वीच पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. तुरळक का होईना परदेशी पर्यटक इथे यायला सुरूवात झालीये. होम स्टे आणि हॉटेल्सच्या माध्यमांतून गावांतल्या लोकांना उत्पन्नाचं साधन मिळालंय. मोबाईल फोन, इंटरनेट, टिव्ही अशा कोणत्याही कनेक्टीव्हिटीपासून डिस्कनेक्ट असलेलं हे गाव पर्यटकांना खुणावतंय. या भागातली आणि पाकिस्तानाच्या उंबरठ्यावरची तीन गावं पर्यटकांसाठी खुली झाली. एक माईलस्टोन दिसला त्यावर त्या गावांमध्ये असलेलं अंतर लिहलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटल्या गेलेल्या ६ गावांचं वर्तमान त्यावर होतं. एकमेकांपासून फक्त ५० किलोमीटरवर असलेल्या ग्रीज या भारतातल्या शेवटच्या गावापासून खापलू हे पाकिस्तानातलं गाव सुरू होतं. या गावांमध्ये खेचली गेलेली ‘लाईन ऑफ कंट्रोल‘ ही गावकऱ्यांच्या आझादीच्या कल्पनांमध्ये बसत नाही. हे सतत त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहतं.

डिस्कीटहून तुरतुकच्या एका शाळेतल्या दोन लडाखी शिक्षिका आमच्या गाडीत सोबत होत्या. पैकी एकीच्या हातात लडाखमधलं प्रसिद्ध वर्तमानपत्रं होतं. पंधरा दिवस, महिन्याभराने तुरतुकमधून मोठ्या गावी जाणारे हे वर्तमानपत्र गावात घेऊन येतात. तोच काय तो उर्वरित लडाखच्या बातम्यांचा आणि तुरतुकचा संबंध. पाल्मो आणि नामचोटी अशी खास लडाखी नावांच्या त्या टीचर्स गावातल्यांबद्दल बरंच काही बोलत होत्या. ‘गावात मुलींना टीव्ही बघणं, रेडीओ ऐकणं याची परवानगी नाही. वगैरै‘ पण कमीतकमी तिथे मुलींना शिकायला देत आहेत यातच त्या दोघी आनंदी होत्या. तुरतुक गावाने मला भारत–पाकिस्तान बॉर्डरवरच्या माणसांना भेटवलं.

रस्ते खोदणारे, गावं जोडणारे

लडाखमध्ये फिरताना अजून एक गोष्ट आवर्जून लक्षात येते ती म्हणजे अशा गुंतागुंतीच्या ठिकाणी रस्ते खोदून गावंच्या गावं जोडणारं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं काम. लडाखमध्ये वर्षातले ८ महिने बर्फ असतो. या काळात गावंच्या गावं संपर्कातून तुटतात. एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये बर्फ वितळण्यास सुरूवात होते आणि लडाख पर्यटनासाठी खुला होतो. बर्फ वितळल्यामुळे चहूबाजूंनी येणारं पाणी हा इथल्या रस्त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पाणी झिरपत राहिल्याने या दरम्यान अनेक ठिकाणी डोंगरच्या डोंगर खाली येतो, कुठे एखादा मोठा दगड गडगडत खाली येतो आणि रस्ता पूर्णपणे उध्वस्त होतो. संपूर्ण प्रवासात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे कामगार चिकाटीने रस्ता खुला करण्यासाठी राबताना दिसतात. आज काम करून पक्का केलेला रस्ता उद्या तसाच राहिल याची शाश्वती इथल्या घाटांविषयी देता येत नाही. निसर्गावर मात करत रस्ते बांधणारे हे कामगार बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड इथून आलेले आहेत. कुटूंब कबिल्यासह हे कामगार भारताच्या सर्वात उंच टोकाला धडकत रस्ते बांधत आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन रस्ते बांधण्याची ही जबाबदारी एखाद्या युद्धपातळीवर पार पाडतात. पर्यटकांसाठी आणि व्यापारासाठी रस्ते खुले करण्याचं आव्हान पेलताना अनेकदा त्यांना अपघातांनाही सामोरं जावं लागतं. घाटमाथ्यावर काम करताना थोड्याशा पावसाने हलका झालेला एखादा दगड वरून गडगडत येऊन एखाद दुसऱ्या कामगाराला घेऊन खाली आ–वासून वाहणाऱ्या सिंधू नदीत झेपावतो तेव्हा दुःख करण्याइतकाही वेळ या कामगारांकडे नसतो. संपूर्ण लडाखमध्ये एकूण सात घाट लागतात. ‘खारदुंग ला‘ जो सगळ्यात उंच मोटरेबल म्हणून प्रसिद्ध आहे. ‘चांग ला‘, ‘झोजी ला‘, ‘फोतू ला‘, ‘लाचूंग ला‘, ‘तांगलांग ला‘ (ला म्हणजे घाट) इतके घाटरस्ते आमच्या प्रवासात लागले. अनेक ठिकाणी आम्हाला काही तास अडकून रहायला लागलं कारण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे कामगार वाहून गेलेला रस्ता पुन्हा बांधत होते. तर काही ठिकाणी वाहत्या पाण्यातून मोठ्या कसरतीने गाडी काढावी लागत होती.

भारताच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, थंडीवारा, बर्फ आणि जीव धोक्यात घालून रस्ते बांधत राहणाऱ्या त्या कामगारांशी बोलल्यानंतर माणसाच्या जिद्दीचं एक उदाहरणच समोर आलं. लेह – कारगिल – द्रास – लेह – डिस्कीट – हुंदर – तुरतुक – पॅनगॉंग – चुशुल – त्सागा – माहे ब्रिज– त्सो मोरोरी – त्सोकर – पांग – सर्चू – किलॉंग – मनाली – दिल्ली असं करत आम्ही १२ दिवसांत २००० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला. हा प्रवास शक्य व्हावा म्हणून हजारों कामगारांचे हात राबतात याची जाणीव लडाखला जाणाऱ्या प्रत्येकाने ठेवली पाहिजे. एकच उदाहरण देते. तुरतुक गावातून निघाल्यावर आम्ही श्योक नदीच्या मार्गाने पॅनगॉग लेककडे निघालो. हा कच्चा रस्ता इतका नदीच्या बरोबरीने जात होता की नदी कोणती आणि रस्ता कोणता अशा प्रश्न पडावा. त्यात नदीचा रंगही मातीच्या रस्त्याशी मिळताजुळता होता.

सकाळपासून सुरू झालेल्या प्रवासात दुपार झाली तरी आमच्या गाडीशिवाय एकही गाडी त्या मार्गावर दिसली नाही. एका टप्प्यावर गेल्यानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा एक तंबू दिसला तिथे समजलं की पुढे सगळा रस्ता नदीमुळे वाहून गेलाय. झालं… आता अडकलो. २०० किलोमीटर मागे जाणं शक्य नाही आणि रस्ता वाहून गेला त्यामुळे पुढे कसं जायचं या काळजीत आम्ही सगळेच पडलो. काळजी फक्त एकालाच नव्हती…. आमचा ड्रायव्हर दोरजी. तो तिथल्या ऑफीसर्सशी बोलेपर्यंत आम्ही चहा घेण्यासाठी उतरलो. १५ मिनिटांत आमच्या गाडीपुढे कामगारांनी भरलेला ट्रक निघाला आणि जिथे रस्ता वाहून गेला होता तिथे आमची गाडी जाण्यापुरता तात्पुरता रस्ता तयार करण्याच्या कामात ते सगळे कामगार जुंपले. साधारण अर्ध्या तासाने त्यांनी दगड टाकून तयार केलेल्या रस्त्यांवर तोल सांभाळत आमची टेम्पो ट्रॅव्हलर पार झाली.

परतीच्या वाटेवर

लडाखमध्ये प्रवास करताना वेगवेगळ्या रंगाच्या दगडमातीच्या पर्वतांची, सिंधू, झंस्कार आणि श्योक या नद्यांची कायम सोबत असते. या नद्यांसारखंच इथल्या लोकांचं जगणं एकाकी आहे. वृत्तपत्रं, रेडिओ, टिव्ही, कॉम्प्युटर, पुस्तकं यांचा स्पर्शही न झालेली गावं लडाखमध्ये पहायला मिळाली. मॉनिस्ट्रीच्या धार्मिक कामांमध्ये गुंतलेली, पश्मिना बकऱ्या सांभाळणारी, पश्मिना लोकरीला योग्य भाव मिळावा म्हणून झगडणारी, पर्यटनाद्वारे थोडीफार मिळकत होणारी एक पिढी तर पर्यटनाला कमाईची लाईन आणि करिअर समजून त्यानुसार गाव सोडून लेह शहरात आलेली दुसरी पिढी असं काहीसं लडाखचं वर्णन करता येईल. सफरचंदी गालाची मुलं, मिचमिच्या प्रेमळ डोळ्यांचे लडाखी, लाकडी पुल, फोटोग्राफी, मॅगी, बुलेट याच्यापलिकडलं लडाख पाहण्याची संधी मला मिळाली. परतीच्या वाटेवर ‘त्सागा‘ नावाच्या गावात होम स्टे केला. ‘याक‘च्या केसांपासून विणलेल्या गोधड्यांनी उबदार झालेलं घर होतं ते. घरमालक जवळच्याच प्राथमिक शाळेत शिक्षक, पश्मीना शेळ्या पाळणारे, शेती करणारे सामान्य गृहस्थ. त्यांनी स्वतःच्या हाताने आम्हाला बटर टी बनवून दिला. लाकडी ओंडक्यात तयार झालेल्या त्या बटर टीच्या चवीपेक्षा मला ते बनवण्याची पद्धत जास्त आवडली. महाराष्ट्रात जसा शेतमालाला भाव मिळत नाही तशीच लडाखमध्ये पश्मीना लोकरीला योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार सगळे शेतकरी करत असतात.

लडाखमधून बाहेर पडताना गेल्या १० दिवसांच्या अनुभवाला एका शब्दांत बांधायचं झालं तर लडाखी भाषेतला शब्द चपखल बसतो. ‘JULLEY’ म्हणजे कधीच विसरू नका.

ता.क – मी माझ्या संपूर्ण आयुष्यात जितकी मॅगी खाल्ली नसेल तितकी मॅगी मी लडाखच्या प्रवासात खाल्ली. हायवेवर ट्रक्सची ये–जा जास्त असल्याने आणि ९० टक्के ट्रकचालक पंजाबी असल्याने आलु पराठा मात्र कोणत्याही हॉटेलात मिळतो हे वैशिष्ट्य. बाकी मॅगीला पर्याय नाही.

Attitude in Life

“With the right attitude,human beings can move mountains.With the wrong attitude,they can be crushed by the smallest grain of sand.”- Jim Rohn

A Shy Beginning

As long as I can remember, I’ve always been in love with the mountains. I grew up amongst them & always tend to go back to them whenever the daily hullabaloo of city life gets to me. 36 more words

Mountains

Auction action fast, furious

{“contentType”:”NEWS_STORY”,”id”:{“value”:”b07d115d77bb4ec688d6327d6cdad07e”,”link”:”http:\/\/api.newsapi.com.au\/content\/v2\/b07d115d77bb4ec688d6327d6cdad07e”},”originId”:”073416c2-cf3d-11e7-bcdf-8d406b4bf11d”,”origin”:”METHODE”,”channel”:”WEB”,”title”:”Auction action fast, furious”,”subtitle”:”Auction action fast, furious in small increments”,”description”:”

THE auction of a renovated cottage in Paddington attracted a crowd of about 50 people and some serious buyers, despite a rainy day. 2,762 more words

32 Prince St, Paddington QLD 4064, Australia

Mayana Peak: Expectation Vs. Reality

If you’re looking for a perfect place to get away from the noise of the city but don’t want to waste time traveling so far, this is the best place for you! 365 more words

Mountains

Mount Karaffa

I have been a little MIA here. I am going to blame that on a little thing we like to call Mount Karaffa. I know you cannot hear me, but I am laughing a bit like a crazy person over here at my use of the word “little”. 1,514 more words

Blended Family