Tags » Mumbai

How to Make Most of Your 2 Days in Mumbai !

Mumbai is a city which never sleeps !

Its a captivating city which is full of life and enthusiasm. Sometimes it becomes difficult to cope up with the fast paced lifestyle of Mumbaikars. 1,068 more words

Itinerary

Supreme Court allows Vodafone to initiate second arbitration over $2 billion tax demand

Neighborhood News Desk/MUMBAI: Supreme Court on Thursday allowed Britain’s Vodafone to initiate a second arbitration process under an India-UK investment pact over New Delhi’s tax demand for more than $2 billion arising out of a deal that was struck a decade ago. 33 more words

India

AtoZ Challenge: L - Latitude

Latitude

This is here is a term which is used to describe a range. Common usage being, a certain camera provides more/less latitude than another one. 150 more words

Photo Assignments

Pastors in India Beaten, Forced to Sign Apology Letter Because the Gospel Offends Hindus

(THIS ARTICLE IS COURTESY OF THE CHRISTIAN POST)

Pastors in India Beaten, Forced to Sign Apology Letter Because the Gospel Offends Hindus

Share On Facebook… 1,200 more words

India

My Love at First Sight with Mumbai

Bombay. That’s what I call Mumbai. Bombay has been my first love ever since I moved here in the year 2013. I come from a small town in Uttar Pradesh, and I had never seen such a high pace of life ever in my life until I stepped into this city. 600 more words

Self Drive Cars

व्हिलपाखरू

पंढरपूर

स्कुटी चालवत गाव घायाळ करत जाणाऱ्या तिला
‘व्हिलपाखरू’ म्हणता येईल का?

पण काहीही म्हणा..पोरी स्कुटी पेपवरच होत्या राव..
आता गाड्या लै झाल्या आणि कचरा पण..
एखाद्या नाजूकालाच घरातून तेवढीच छोटी स्कुटी पेप 80cc मिळायची..
आवर्जून गुलाबी कलर असलेली..
त्यावर फुलांची डिझाईन..
दप्तर आवर्जून पायातच असायचं तिचं..
दोन्ही खांद्यावरून ओढणी मागे घेऊन कमरेवर त्याला गाठ टाकलेली..
ओढणी कधी हवेवर स्वार नाही झाली तिची..
स्कार्फ वगैरे त्यावेळी तिच्या गावी पण नव्हतं..
शांत सालस गोड मधाळ चेहरा गाडीवर मात्र नेहमी बावरलेला असायचा..
तिच्या चेहऱ्याकडे बघून मात्र वाटायचं की हे फुल पडणार तर नाही न का याची काळजी करणारे इतके चेहरे आजूबाजूस आहेत की हिने फक्त गोड हसावं..
तीपेडी वेणी घालून मागे सोडलेला तो शेपूट गोंडा पाठीवर हेलकावत असायचा..
गाडी पण इतकी हळुवार चालवायची की जस फुलपाखरू या फुलावरून त्या फुलावर..अलगद..
तिच्या आधी सायकल काढून कॉलेजच्या गेटवर जाऊन घोळका करून उभं राहण्यात मजा होती..
गर्दीतून एखादी शीळ घुमली किंवा कमेंट पास झाली की हलकेच डोळे वटारून किंवा कधी अनपेक्षित स्माईल देऊन ती गेली की इकडे पोरांची काळीजं उभ्या जागी नाचायला लागायची..
प्रत्येक कॉलेज मध्ये अशी एक तरी असणारच..आवर्जून..स्कुटी पेपवालीच..तीही गुलाबीच..

पुणे

पेट्रोल पंपावर रांगेत गाडी स्टँडवर लावून नजाकतीने ते सीट उघडायचं, पेट्रोल भरून कार्ड मारायचं. नव्या तंत्रज्ञानाचं कौतुक करावं की कॅशलेसच तंत्रज्ञान अवगत करून सफाईत वापरणाऱ्या तिचं.

कॉलेज च्या गेटबाजूला पार्किंगमध्ये अवघडलेपणाने पण तरीही काळजीपूर्वक गाडी पार्क करायची आणि काढतानाही चेहऱ्यावर स्कार्फरुपी शिरस्त्राणाचा पेहराव चढवायचा, बऱ्याचदा डोळ्यावर ते न शोभणारे गॉगल चढवायचे कारण त्या कॉफी ब्राऊन डोळ्यांची काळजी घेणे ही तेवढेच महत्वाचे.

आजूबाजूला कितीही धूळ माती असू द्या, तिची पेप नेहमीच चारचौघी बाईकांत उठुन दिसणारी तिच्यासारखीच निर्मळ, स्क्रॅचलेस आणि अपटूडेट.

तिचा ड्रेस नेहमीच पेपच्या रंगला कॉम्प्लिमेंट करणारा. कोणताही रंग असो, स्कुटीच्या रंगात आवर्जून मिसळून जायचा.

कमालीचे दिवस होते. तिची स्कुटी आणि ती सुद्धा कायम स्मरणात राहील, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न न केल्याच्या आठवणीसोबत.

मुंबई

तिच्या स्कुटी पेपचा आवाज आला तरी ह्रदयात धडधडायला होत होतं. तो आवाज आणि ती गेल्या नंतर, तिच्या अत्तराचा सुगंध हा मातिच्या सुगंधा सोबत अवती भवती दरवळत रहायचा. ती पुढे निघून गेली तरी तो सुगंध प्रेयसीनं घट्ट मिठीत धरून राहव तस तो वलय बणून आम्हाला घट्ट धरून राहत.

तेव्हा तिला आपल्या ह्रदयात जपून तसे भरपूर प्रेमवीर होते, म्हणजे सांगायच म्हटलं तर गावाकडंचा तारूण्यातील एक-एक तरूण, कारण तशी ती परमेश्वरानं घडवलेली एक सुंदर मोहिनीच होती. किती हि नाही म्हटले तरी प्रत्येकाच्या ह्रदयात तिचा ठाव घेणारी एक झुळूक होतीच, जी गारठलेल्या ह्रदयाला प्रेमाची उब देत होती मग ते एकतर्फी का असेना.

तिनं गाव सोडलं, पुढील शिक्षणा साठी तिला शहरात जावं लागलं, ती गेली, ती गेल्या नंतर उन्हाळ्यात जसा दुष्काळ पडावा तसा कॉलेजच्या कट्ट्यांवर अन वेशीवरच्या वट्ट्यांवर दुष्काळ पडला. स्कुटी पेपचा आवाज हि बंद झाला आणि मिठीत घेणारा सुगंध वाऱ्यासोबत हरवून गेला.

ती गेल्या नंतर आम्ही तिघे हि विखुरले गेलो. राजन मात्र गावीच राहिला, समीर त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेला आणि मी मुंबईला आलो. तिघे वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी तिघांच्या ह्रदयात तिच्या आठवणींच फुल तस जपूनच होतं

तिघे हि आपापल्या विश्वात तसे रमलेलो, नंतर कळाले कि समिरला ती पेट्रोल पंपावर दिसलेली, पण त्यानंतर ती त्याला कधीच दिसली नाही. ज्या क्षणी मला हे कळाले तेव्हा ह्रदयातल्या फुलाला कोणी टिचकी दिल्याचा भास झाला. मी सावरलं आणि आपल्या कामाला निघालो.

क्लायंट मिटींग मुळे आज जरा ऑफिस मधून लवकर निघालो, सुर्य तसा डोक्यावरच. सावलीच्या शोधात तसा प्रत्येक जण होता. मी हि धडपड करत होतो, त्या धडपडीत एक ओळखीचा आवाज कानी आला, मन तर नाही म्हणत होते पण ह्रदयाकडून मात्र हो ऐकू येत होते. या तळपत्या उन्हात सावली आपल्या छायेचा पदर डोक्यावर टाकणारच पण पुन्हा त्या ओळखीच्या सुगंधाने वलय निर्माण करून मला मिठीत घेतले आणि उडवीकडे वळून पाहतो तर काय आपल्या स्कुटी पेप वर दिवसा स्वप्नांचे भास देणार ते ‘व्हिलपाखरू’.

© राहुल, स्वप्निल, चेतन

लेख | Article

My India

Just before Dubai, I was in India! A little context first, in the UK only my mum, dad, brother and I live here, meaning all my family are back in India. 271 more words

Travel