Tags » Odissi

A Bharathanatyam - Odissi double bill in Mexico City. 25th May 2018

What better way to get to know an artistic colleague than to perform together on stage? We have chosen ‘Krishna’ as the theme for the evening, the inexhaustible theme that it is! 74 more words

Bharathanatyam

पोहेला बैसाख

एसकेपेड (Escapade) च्या दुसऱ्याच दिवशी मैत्रेयीचा पोहेला बैसाख, म्हणजेच साऊथ एशियन न्यू इयर फेस्टिवल मध्ये ओडीसी डान्स परफॉर्मन्स होता. ४ ते ६ डिग्री सेलसिअसच्या थंडीत हा कार्यक्रम कसा होणार हीच चिंता होती. पण कलेचे उपासक वर्षाकाठी एकदाच येणाऱ्या या फेस्टिवल मध्ये थंडीने थोडेच घाबरणार होते. आऊटडोअर थिअटर असल्याने सकाळच्या पावसाने कार्यक्रम सुरु व्हायला थोडा उशीर केला. पण एकदा चालू झाल्यावर एकामागून एक होणारे कलेचे अविष्कार प्रेक्षकांना मोहवून टाकत होते

आदल्या दिवशी एसकेपेड(Escapade) च्या निमित्ताने वेस्टर्न नृत्याचा आस्वाद घेतल्यानंतर इथे तर क्लासिकल, लोकनृत्य, बॉलीवूड, वेस्टर्न आणि फ्यजन अशा अनेक नृत्य प्रकारांची पंगत होती. थंडीला न जुमानता बॉलीवूडच्या ठुमक्यांवर गिरकी घेणाऱ्या आणि प्रेक्षकांनाही टाळ्या वाजवायला लावणाऱ्या त्या ४ ते ५ वर्षाच्या मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. बांगलादेश आणि बंगालच्या बंधू भगिनींनी सादर केलेले अस्सल बांगला नृत्य अतिशय मोहक तर संगीत निव्वळ श्रवणीय होते.

अग्नी च्या युवक युवतींनी ठेका घेत स्टेज चा कब्जा घेतला आणि नावाप्रमाणेच धडाकेबाज नृत्य सादर करून सर्वांची मन जिंकून घेतली. मॉंन्सून डान्स कंपनी बाल कलाकारांना प्रोत्साहन देत पुढची नृत्यप्रेमींची पिढी विकसित करताना दिसत होती तर सरगम डान्स किव्वा ओडिसी डान्स कंपनी भरत नाट्यम् आणि ओडीसी सारख्या क्लासिकल नृत्याची भारतीय परंपरा सांभाळत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होत्या

साऊथ एशियन फेस्टिवल असला तरी त्यात वेस्टर्न आणि फ्यजन नृत्त्यांची कमी नव्हती. बॉलीवूड च्या जोडीला हॉलिवूड देखील स्पर्धा करत होत आणि हि जुगलबंदी प्रेक्षकांना दोन्ही संस्कृतींच खूप छान दर्शन घडवत होती.

हा उत्सव खरया अर्थानें ऑस्टिनची मिश्रसंकृती अधोरेखित करत होता.फेस्टिवल ला दर वर्षी मदत करणाऱ्या ऑस्टिन चे मेयर स्टिव्ह अड्लर यांची उपस्थिती ह्या फेस्टिवल च महत्व दाखवते. भारतापासून दूर जगाच्या ह्या टोकाला भारतीय संकृतीचा हा उत्सव म्हणजे कलेच्या उपासकांना एक पर्वणीच होती. कुठचेही प्रवेश शुल्क न घेता कलेच्या प्रशंसकांच्या मदतीतून चालणारा हा उत्सव म्हणजे नवकलाकारांना त्याची कला सादर करायची एक सोन्याची संधी.असे कार्यक्रम राबवून लोकांना कलेची मेजावनी देणाऱ्या ऑस्टिन च्या कलोपासकांना मनापासून धन्यवात

Austin

Odissi Diary | Srjan | 2016

27 January 2017 – Chinese New Year

Organized by Regina, but everybody cooked. Except me, I bought chocolates for everybody. We are from: Spain, Belgium, Romania, India, China, Italy, France, Russia. 82 more words

BLOG

MUMBAI ODISSI UTSAV 2018

2018 is seeing a great start for the Dance lovers in Mumbai – first with NCPA Mumbai Dance Season(Jan-Feb) followed by Mumbai Odissi Utsav(Feb), EVAM 2018(Feb) and IIDF Mumbai 2018(March) 56 more words

Photography