Tags » Q

Impractical Jokers live in London!

Hey guys!

On the 8th January, I had the pleasure to go see The Impractical Jokers! I have to tell you, they were amazing and I’ve never laughed so much XD… 492 more words

T.V

५१०) आभार -- आभार --आभार

५१०) आभारआभारआभार 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी विमुद्रिकरणाचा (demonetization) चा देशहितासाठी चांगला निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला. ३० डिसेंबर २०१६ पर्यंत रद्द झालेल्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा बँकेत भरण्यासाठी दिलेली मुदत काल  संपली. यथावकाश विमुद्रिकरणाचा नेमका काय फायदा झाला ह्याची माहिती आपल्याला कळेलच. निर्णय चांगला असला तरी निर्णयाची कार्यवाही अधिक चांगल्या रीतीने होऊ शकली असती. असो.

परंतु ह्या काळात देशातील वातावरण फार बिघडले नाही. लोकांनी सुद्धा अपेक्षेबाहेर सहकार्य केले. काही लोकांना रांगेत उभे राहण्याचे श्रम न झेपल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

ह्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी त्रास सहन केला त्या सर्वांचे फेसबुक प्रेमींतर्फे मनापासून आभार मानण्यासाठी ह्या लेखाचे प्रयोजन.

बँकेतील कर्मचाऱ्यांनी गेले ५० दिवस अहोरात्र काम केले, त्याबद्दल त्यांचे आभार. पोलीस दलाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चांगल्या रीतीने हाताळला, त्या बद्दल ते सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. त्याच प्रमाणे ATM मध्ये सुधारणा करण्यासाठी engineers नी सुद्धा भरपूर मेहनत घेतली आहे. काही राजकीय पक्षांनी व सेवाभावी संस्थांनी लोकांना बसण्यासाठी खुर्च्या, ऊन लागू नये म्हणून मांडव, चहा – पाण्याची सोय केली त्याबद्दल त्यांचे आभार. खातेदारांनी सहनशीलता ढळू न देता शांतपणे रांग लावली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत. अर्थात काही अपवाद आहेत.

ह्या पुढील पायरी म्हणजे जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस झाले पाहिजेत. ह्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत.

ह्या वर्षाचा आज शेवटचा दिवस. पुढील वर्ष तुम्हा सर्वांसाठी व देशासाठी चांगले जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

टीप: हि पोस्ट share करावी हि विनंती.

सुधीर वैद्य

३११२२०१६

Spandane Articles

Star Trek: Deep Space 9 Season 1 "Q-Less" and "Dax"

I’ve completed my re-watch of “Star Trek: The Next Generation.” Now it’s time to start Deep Space Nine! I am much less familiar with this show, though I’m pretty sure I’ve seen about 80-90% of the episodes.  883 more words

Star Trek