Tags » Sandstorm

Sandstorm

I dropped a gear and sped into the Karakum desert, nature’s full fury laid out before me. Lightning flashed to the left and right of the tiny car, the air crackled and sparked. 1,132 more words

Adventure

January 6 & January 7, 2017: Pompeii & Sandstorm

Pompeii – Bastille

When you have a night to yourself and think about what you have to do or what missions you have to accomplish, you can really get some work done. 625 more words

Music

Finland’s Epic New Year’s Eve Countdown

Finland’s Epic New Year’s Eve Countdown

New Year’s Eve rose to a whole new level of awesome in the capital city of Helsinki, Finland last weekend. 109 more words

Findyoursounds

Sandstorm (Sigma Force #1)

by James Rollins

“An inexplicable explosion rocks the antiquities collection of a London museum, setting off alarms in clandestine organizations around the world.

And now the search for answers is leading Lady Kara Kensington; her friend Safia al-Maaz, the gallery’s brilliant and beautiful curator; and their guide, the international adventurer Omaha Dunn, into a world they never dreamed existed: a lost city buried beneath the Arabian desert.

206 more words
Book Review

Welcome year 2017!!!

The awful year 2016 is now over!!!!!!! I will start to create much BETTER memories!

And this Awesome Finland will be this year 100 years old!!!

Going Forward

बावीस एप्रिल, 1998

काल लिहायचं होतं पण जमलं नाही. आजही जमलं नाही, शेवटी चोवीस तारीख उजाडली. असो, त्याने विशेष फरक पडत नाही कारण काही घटना, दिवस कालातीत असतात. काळ मोजमापाच्या पट्टया निरर्थक आहेत अशावेळी. मला इंग्लिश मधला एक शब्द जाम आवडतो. इमॉर्टल. माझ्यासाठी किंवा आपल्यातल्या बऱ्याच जणांसाठी असाच एक ‘इमॉर्टल’ दिवस. बावीस एप्रिल, 1998.

भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया शारजा मध्ये खेळत होते. प्रत्येकाच्या दोन राउंड रॉबिन मॅच होत्या. ऑस्ट्रेलियाने सगळया मॅचेस मारल्या होत्या. आपण आणि न्यूझीलंड रडतखडत. फायनल पूर्वीची शेवटची मॅच. आपण विरुद्ध ऑस्ट्रेलिया. बावीस एप्रिल. आपला फायनल मधला सहभाग एकतर जिंका किंवा नेट रनरेट न्यूझीलंड पेक्षा चांगला ठेवा अशावर हिंदकळत होता.

ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग आली. मार्क वॉ आणि भरवशाचा बेवन लागले. बेवनने शतक टाकलं. त्यानी 284 केले. नेट रनरेटने जिंकताना पाठलाग करत असू तर जरा बरं असतं. डोळयासमोर निश्चित ध्येय असतं. एकदोन बॅट्समन एकहाती मॅच काढू शकतात. धावा रोखताना मात्र हवाल्यावरच. तर आपल्याला फायनलला जाण्यासाठी जिंकलो नाही तरी चालेल पण कमीतकमी 254 करायच्या होत्या.

मध्येच एक गंमत सांगतो. हया स्पर्धेच्या अगदी काहीच दिवस आधी आपण ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे अशी तिरंगी स्पर्धा झाली. भारतात. तो पेप्सी कप होता आणि हा कोका कोला. त्या काळात अगणित स्पर्धा हया दोघांनी स्पॉनसर केल्या होत्या. त्या पेप्सी कप मध्ये आपण सगळे साखळी सामने मारले होते. आणि फायनलला आपण ऑस्ट्रेलिया कडून हरलो होतो. आता कोकाकोला कप मध्ये ऑस्ट्रेलियाने सगळया मारल्या. बघुया पुढे काय होतय ते.

या परत एकदा शारजाला. सचिन आणि गांगुलीने सावध सुरुवात केली. आणि तो थ्रेशहोल्ड पॉइंट आला. कासप्रोविच बोलिंग करतोय. शॉर्ट पिच बॉल, सचिन पुढे आला आणि मिडविकेट वरुन भिरकावून दिला त्याला. पुढचा बॉल, अजून एक शॉर्टपिच बॉल, या वेळी सचिन क्रिझ मध्येच, अजून एक सिक्सर. त्या फटक्यांचं वर्णन करायला disdain हया व्यतिरिक्त शब्द मला सापडत नाही. एखादया सतत कानाशी गुणगुण करणाऱ्या डासाला ज्या भावनेने आणि सहजतेने आपण मारतो त्याहून हे वेगळ नव्हतं.

एकतीसावी ओवर संपता संपता मैदानावर धुळीचे लोट आले. शारजात वादळ आलं होतं आणि खेळ थांबला. आपले चार एव्हाना तंबूत परतले होते. सचिन बरोबर नवखा लक्ष्मण होता. धावांची सगळी समीकरणं बदलली. मॅच आता 46 ओवर्सची झाली होती पण करायचे रन्स साधारण तेव्हढेच राहिले.

जेव्हा विश्रांतीनंतर मॅच सुरु झाली. तेव्हा सचिन स्ट्राइकला होता. सामान्य माणूस काय करेल. एक धाव घेईल. पण त्या दिवशी सचिनचा सूर काहीतरी वेगळाच होता. ब्रेक नंतरचा पहिला बॉल त्याने बोलरच्या डोक्यावरुन भिरकावला. षटकार. आणि सचिन सुटलाच. वाळूच्या वादळाची कमतरता त्याने भरून काढली. काय अचाट धावलाय त्या दिवशी. कितींदातरी एकाऐवजी घेतलेल्या दोन धावा आणि शेवटच्या बॉलला काढलेल्या सिंगल्स.

सचिनच्या डोक्यात भूत शिरलं असावं. एकहाती मॅच संपवायचा त्याचा विचार होता. आतापर्यन्त इतक्या मॅच पाहिल्या. जबरदस्त टायमिंगचे शॉट्स पाहिले. पण स्टीव वॉ ला सचिनने त्या दिवशी पुढे येऊन मारलेला जो शॉट आहे, तो काहीतरी अचाटच. नाही, तुम्ही एकदा पाहाच आणि मग ठरवा. सचिनचा झंझावात असा होता की त्याच्या आणि लक्ष्मणच्या शंभरएकच्या भागीदारीत लक्ष्मणचा वाटा वीसचा होता.

आपण आरामात फायनलला क्वालिफाय झालो. पण सचिनला तिथे थांबायचं नव्हतं. तो जिंकायच्या इराद्याने पेटला होता. फ्लेमिंगला झोडायला सुरुवात केली. शेवटी जेव्हा आऊट झाला तेव्हा आपल्याला तीन ओवर्स मध्ये 34 धावा काढायच्या होत्या. आपण आधीच फायनलला पोचलो होतो. पाच विकेट हातात होत्या. हरण्याची काही भीती नव्हती. आपल्या लक्ष्मण आणि कानिटकरने किती धावा काढल्या असतील. काही कल्पना करा. अठरा बॉल मध्ये फक्त आठ. काय बोलाल हया पुढे. किती दरिद्रीपणा होता विचार करा.

मॅच अर्थात आपण हरलो होतो. पण हारकर भी जितनेवाले को बाझीगर कहते है, असं झालं होतं आपलं. सचिनच्या त्या assault ने आपण ऑस्ट्रेलियाला अक्षरशः खच्ची केलं. दोन दिवसातच आपण त्यांच्याशी फायनलला भिडणार होतो. तारीख होती चोवीस एप्रिल. तोच रंगमंच, तेच नेपथ्य, तेच कलाकार, तेच प्रेक्षक. परावाच्या तिकीटावर नवीन प्रयोग चालू झाला. शेवट मात्र थोडा वेगळा झाला. यावेळी आपण जिंकलो होतो. कोकाकोला कप आपल्या पदरात पडला होता. सचिनने अजून एकदा ऑस्ट्रेलियाला चीत केलं होतं.

साल होतं एकोणीसशे अठयाणव. तारीख होती चोवीस. सचिनचा गॉड मोड ऑन झाला होता. आमेन.

#केदारओक

Marathi

Sandstorm - Darude

Happy Techno Day! And it’s also a Friday! That means Jukebox Friday. Don’t worry, the kinky advent calendar of the day would come on later today. 111 more words

Jukebox Friday