Tags » Section IV- My Poems

69 वाळूत फिरताना........ 

69 वाळूत फिरताना…….. 

वाळूत फिरताना आठवणीत रमत गेलो

बालवयातील अनेक खेळ खेळून दमलो.

वाळूप्रमाणे वर्षे सरत गेली.

काही बाही देऊन गेली

बरेच काही घेऊन गेली.

मनासारखी भरती कधी आलीच नाही.

ओहोटी मात्र अनेकवेळा  अनुभवली.

भरती आणि ओहोटी म्हणजेच आयुष्य

हेच मनाला समजावीत गेलो

पाय वाळूत उमटवत गेलो

मनात  नशिबाची कीव  करत गेलो.

असे वाटते कि चटकन मोठी भरती यावी

आणि त्यावर स्वार होऊन खेळी करावी

नाहीतर नकोच. काहीतरी शिल्लक ठेवण्यातच तर मजा असते.

सुधीर वैद्य

११-१०-२०१७

Section IV- My Poems

68) नवीन वर्ष 

68) नवीन वर्ष 

नवीन वर्ष दर वर्षीच  येते आणि जाते.

काही जुने प्रश्न ठेवून जाते.

नवीन प्रश्न देऊन जाते किंवा

जुन्या प्रश्नाला नवीन स्वरूप देऊन जाते.

जुन्या नव्याचा खेळ चालूच राहतो.

प्रश्नांचा चालतो खेळ, आपला मात्र जातो वेळ.

आणि मग उभी ठाकते ती वेळ.

परत एकदा नवीन जन्मात आपण मांडतो नवीन खेळ.

सुधीर वैद्य

०१-०१-२०१७

Section IV- My Poems

६७) येरे येरे पावसा

६७) येरे येरे पावसा

उन्हाळा संपला, पावसाचा महिना सुरु झाला.

श्रावण महिना संपायला आला.
पण पुरेसा पाऊसच नाही आला.
तसा एकदोनदा शिडकावा झाला.
पण सगळ्यांनाच कोड्यात टाकून गेला.

शेतकऱ्याला कळेना की दुबार पेरणी करावी का नाही?
शहरवासियांना कळेना की पुढील वर्षापर्यंत पाणी मिळेल का नाही?
सरकारला कळेना की Package द्यावे लागेल की नाही?
मला कळेना की Tanker मध्ये जमिनीतून पाणी येईल की नाही?

हे पावसा मी तुझ्यावर रागावलो आहे.

पाऊस म्हणजे तुझे पृथ्वीवरील प्रेम.
पण तू तर नटखट प्रियकरासारखा प्रेयसीला विव्हळ करू लागलास.

माणसाने निसर्गावर भरपूर केला आहे अत्याचार.
त्याचाच बदला तू घेतो आहेस आमच्यावर.
पण हे पावसा, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली नाहीये.
ज्यांच्यावर तुला बदला घ्यायचा आहे ते मात्र आहेत खुशीत (कारण दुष्काळ आवडे सर्वाना …)
पण सामान्य माणूस मात्र भरडला गेलाय तुझ्या बदल्यात.

परत एकदा लहानपणचे गाणे म्हणतो.
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा.
(पैसा त्याकाळीच खोटा झाला होता. आतातर रुपया हि घसरला.
पावसा तुला डॉलर दिला असता, पण काय करणार? परकीय गंगाजळी सुद्धा आजच्या अस्थिर जागतिक वातावरणात पुरेशी नाहीये.)

पावसा आता तूच काय ते ठरव. आता वेळ न दवडता लगेच ये आणि मोठ्या अंत:कारणाने आम्हाला माफ कर. नाहीतर आम्हाला शंकराला साकडे घालावे लागेल.
त्यापेक्षा मीच येतो तुझ्याकडे. सर्वांच्या वतीने साकडे घालायला.

येरे येरे पावसा ” ” ” ” “येरे येरे पावसा ” ” ” ” “

सुधीर वैद्य
०३-०९-२०१५
Section IV- My Poems

६६) प्रेम आणि भेट वस्तू - चिंतन

६६) प्रेम आणि भेट वस्तू – चिंतन

प्रेम म्हणजे प्रेम असत

तुमचे आमच सेम नसत

आमच प्रेम खर असत.
तुमच प्रेम बेगडी असत…………

प्रेमाची एकच व्याख्या नसते.
तुमची आमची व्याख्या नक्कीच वेगळी  असते.

तुमची प्रेमाची व्याख्या शारीरिक असते.
आमची प्रेमाची व्याख्या मात्र व्यापक असते.

तुमच प्रेम सिद्ध करण्यासाठी भेट वस्तू लागते

कारण तुमच प्रेम भेट वस्तूच्या मिळण्यावर अवलंबून असत.

भेट वस्तू दिली म्हणजे प्रेम असतच असा नाही

आमच्यात भेट वस्तू न देताही प्रेम असत

कारण  आमचे प्रेम भेट वस्तूवर अवलंबूनच नसत.

आमचे प्रेम मनात असते , मनातून चेहऱ्यावर झिरपते,

आणि समोरच्याचा मनाचा ठाव घेते आणि त्याची/ तिची नजर जमिनीकडे वळते.

आम्ही कामावर प्रेम करतो.
आम्ही कामाने मिळणाऱ्या समाधानावर प्रेम करतो.
आम्ही निसर्गावर प्रेम करतो व त्याचा मान राखतो.
आम्ही आई वडिलांवर प्रेम करतो.
आम्ही कुटुंबावर प्रेम करतो.
आम्ही मित्रांवर प्रेम करतो
आम्ही संकटावर सुद्धा प्रेम करतो.
आम्ही देवावर प्रेम करतो.
आम्ही शरीरावर सुद्धा प्रेम करतो पण तो शरीर धर्म असतो.

आमच्यावर मात्र कोणीच प्रेम करत नाही.
कारण आमच प्रेमच  कोणाला समजत नाही.
हेच आमचं दु: ख  आहे मित्रानो.

म्हणूनच म्हणतो की
तुमची आमची व्याख्या नक्कीच वेगळी  आहे.
आमची प्रेमाची व्याख्या व्यापक आहे.
ह्याच मस्ती मध्ये मी दंग आहे.

सुधीर वैद्य

१४-०२-२०१५

Section IV- My Poems