Tags » Sehwag

Sehwag Ab Bhi Yaadon me ho Tum...

जब से होश संभाला और क्रिकेट खेलना और देखना स्टार्ट किया….तब से अब तक की एक ही कहानी….
टॉस हो चूका है….भारत बल्लेबाजी करेगा….स्कूल का टाइम हो चूका है…सहवाग अपने बल्ले से रनों की बारिश कर रहा है…

Bachpan!

MCL2020: Libra Legends, Gemini Arabians to face-off in opening clash

A much awaited tournament of the year 2016 will be kicked off to a flier when Libra Legends face Gemini Arabians on January 28th in Dubai. 253 more words

Blog

Two of Cricket's Greatest Legends Will Bat Together in New York

For cricket fans, it’s a once-in-a-lifetime opportunity. For Americans just getting acquainted with the sport, there can be no better introduction than seeing two of the greatest to ever play the game do so on the same team. 155 more words

Tu mera Viru : An open letter from a fan

Dear Viru,

This post is overdue. Not just overdue, it’s very late. Still it’s not as late as you played your favourite cut shot, leaning away to slash the ball over the waiting slips. 822 more words

Cricket

वीरूची रिटायरमेंट

वीरूची रिटायरमेंट अपेक्षित होतीच पण फक्त पाच दिवसात परत एकदा लिहावं लागेल असं वाटलं नव्हतं. गांगुलीच्या कारकिर्दीत तयार झालेली अजून एक तलवार म्यान झाली.
सेहवाग बद्दल काय बोलायचं? हा माणूस मॅचच्या आधी तासभर आणि मॅचनंतर तासभर चर्चा करण्याचा नव्हताच. त्याने सिक्स किंवा फोर कसा मारलन किंवा तो आउट कसा झाला असा शब्दांचा चोथा करणं हे पाप आहे. त्याच्या बॅटिंगचा फक्त आनंद घ्यायचा. काही माणसं थोड्याच वेळात लळा लावतात आणि अल्पावधीत चुटपूट लावून निघून जातात, त्याच पंथातला हा.
उण्यापुऱ्या १२ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत हयाने काय दिलं नाही? भारताच्या टेस्ट मॅच बॅटिंगचा mould च बदलला पठयाने मग बाकी काय केलं, किती रन्स काढल्या हा विषयच गौण आहे.
….
वीरू,
तरीही तू पाकिस्तानची पाकिस्तानात जाऊन जी काय वाजवलीस ते आम्ही विसरणार नाही. आफ्रीकेची चेन्नईत केलेली दमछाक, लंकेत 199 वर असताना केवळ 11 व्या नंबर च्या बॅट्समन ला वाचवायला ‘नं’ घेतलेली एक रन, सिक्स मारून शतक द्विशतक त्रीशतक करायचं तुझं ऑब्सेशन, हे आम्ही कसं विसरू.
दोन साली न्यूझिलण्ड मध्ये जिथे सगळे सळो की पळो झाले तेव्हा एकहाती लढाई करणारा तूच. अकराच्या वर्ल्डकप ला प्रत्येक वेळी boundary ने श्रीगणेशा करणारा तू आणि स्पिनबोलिंग असं काही नसतच असं आम्हाला वाटेल इतपत त्यांची कत्तल करणाराही तूच.
आठला चेन्नईला इंग्लैंड विरुद्ध तू चौथ्या दिवशी संध्याकाळी जे काही खेळलास त्यासाठी तुझे शंभर गुन्हे माफ. तुझी ती सर्वोत्तम खेळी ठरावी. हनुमानाने लंकेत आग लाऊन कदाचित जो हल्लकल्लोळ माजवला असेल तसा तू लंकेविरूद्ध ब्रेबोर्नला माजवलास. जो काही आग्यावेताळ झाला होतास ते अभूतपूर्व. एका दिवसाच्या आत 284 मारतं का कुणी. आणि तीनच्या बॉक्सिंग डे ची इनिंग राहिलीच. बास बास. किती आठवणार हा पामर. असो.
तुझ्या खेळाने मैदानावर आणि निर्मळ खुमासदार वक्तव्याने मैदानाबाहेर आम्हाला तू जे असंख्य निखळ आनंदाचे क्षण दिलेस त्या बद्दल तुझा शतशः ऋणी.
तुझ्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.

जाता जाता, बॉयकॉट एकदा आपल्या वीरूला काही तरी बोल्ला. वीरू म्हणतो कसा, ‘बॉयकॉट काय म्हणतो मला काही फरक पडत नाही. एकदा त्याने दिवसभर बॅटिंग केली आणि एकही बॉण्डरी मारली नाही.’
हे फक्त हयाने च बोलावं.

Cricket

The Viru Days

Cricket before 15 years wasn’t the same. ODI was still the most popular version, opening slots weren’t as dynamic and specialist openers often decided the fate of an elusive encounter. 469 more words

Life!