Tags » Shruti

न्याय

श्वास अडकला

हवा बाहेर न आत

तुझ्या एका कटाक्षाने

माझा केला घात

रात गेली सारी

चंद्र दिसला न मला

मिठी सोडवून

हातांआड जो लपला

अशा खुणा, असे व्रण

सांगावे ते कसे?

ओठांवर खोल

तुझ्या अस्तित्वाचे ठसे

गुन्हेगार दोघं

शिक्षा मला एकट्याला

खटल्यात जिवणीचा

तीळ ना मोजला!

-श्रुती अशोक..

Shruti

कश्मकश..

३-०-३ ची एक गोळी एकदा अगदीच हिरमुसली

चाप ओढता सुटण्याऐवजी खोल बंदुकीत दडून बसली

म्हणते कशी, मला नाही कोणाचाही घ्यायचा जीव

माणूसकी नाही तर नाही, येऊ द्या हो थोडी कीव

जाऊन जर का लागले मी कोणा कोवळ्या सैनिकाच्या छातीवर

लाल च रक्त सांडेल त्याचे, काळ्याच रंगाच्या मातीवर

माझा मालक घरी गेला कि अम्मी नि अब्बू खुशीने हसेल

त्याला ही तर घर असेल, बाबा असतील, आई असेल

मालकावर मुहोब्बत असणारी त्याची बेगम आहे जशी

डोळे लावून वाट पाहणारी त्याचीही असेल बायको गर्भारशी

मी घेतले प्राण त्याचे तर मालकाला मोठा सन्मान मिळेल

पण त्याला उद्या बाळ होईल, त्याला बापाची माया कशी कळेल?

एकेका लेकराला फुलासारखा माया देऊन पोसायचं

माणसानं आखलेल्या सीमारेषांमुळे मातीने किती सोसायचं??

सख्या तिच्या म्हणाल्या तिला, “जाऊ दे ग, नशीब आपलं!

माणूसकी जर असती खरंच तर माणसाने नसतं का माणसाला जपलं?

तू एक मारणार नाहीस, तर हे दुसऱ्या अस्त्रांनी रक्त सांडतील

संपतील जेव्हा शस्त्रास्त्रे सगळी, माणसं दगड-गोट्यांनीसुद्धा भांडतील

तू आपली पडून राहा बंदुकीत, त्याने नाही बदलणार काही

माणसं वापरून फेकता येतात, बंदूक फेकणं अवघड नाही!!”

-श्रुती अशोक..

Shruti

தமிழ் பேசும் நடிகைகள் யார் யார்!

கமல் ஹாஸனின் மகள்கள் ரெண்டுபேரும் சினிமாவில் நடிக்க வருவாங்களான்னு ஒருமுறை கமல்கிட்டயே கேட்டாங்க.

அது அவங்களோட முடிவு என்று கமல் சொன்னார். ஸ்ருதி இசைத்துறைக்கும், அக்‌ஷரா தொழில்நுட்பத் துறைக்கும் போவாங்கன்னுதான் எல்லோரும் நெனச்சிருந்தாங்க.

அதுக்கேத்த மாதிரி ஸ்ருதி மியூசிக், பாட்டுன்னு இண்டெரஸ்ட் காட்டிக்கிட்டு இருந்தாங்க.

पूर्णविराम

पारावरच्या पिंपळाचा खासच होता थाट

हिरव्याकंच पानांची होती गर्दी भारी दाट

पिटुकले एक पोपटी पान नुकते होते उगवले

समोरच्या डहाळीवरले पान पिवळसर मग खुलले

पानबाळ म्हणाले, “आजोबा, का तुमचं अंग असं जर्जर?”

आजोबा म्हणाले, “पिकलं पान, गळून पडणार मातीवर!”

बाळ बावरले, म्हणाले, नको रे देवा असे मरण

अमर व्हावे, चिरतरुण रहावे, वार्धक्याची नको आठवण

आजोबा हसले मिशीत अन् हळूच म्हणाले बाळाला,

“जगून हर क्षण आनंदाने, देता येतो शह काळाला

पाहिलेत मी किती उन्हाळे, इंद्रधनूष्ये कितीतरी

कितीक ओले मोती झेलले, वादळे भेटली ऊराऊरी

चिऊकाऊची घरटी वसता चिमणबोल कानावर पडले

पायथ्याच्या छोटुकल्या भोलेनाथ मंदिरी भक्तिरसाचे दर्शन घडले

पारावरती भेटी होता रेशीमगाठी जुळलेल्या

निःशब्दातल्या गुजगोष्टी मग मलाच कितीदा कळलेल्या

न्यायनिवाडे घडले आणि किर्तने झाली संतांची

वाटसरूही विसावले मी सावली धरता हातांची

क्षणभंगुर जरी जीवन, बाळा, कर्मयोगाचा वसा तू घे

तृप्ततृप्त मग होईल हर क्षण, अमरत्वाचे रहस्य हे!!”

-श्रुती अशोक..

Shruti

ए  दिल..

मुहोब्बत कर लेने दे,

दर्द-ए-दिल सहने दे, ए दिल

या ऐसा गुनाह बता दे,

जिसकी सजा न हो

इबादत करने दे,

चाहत मे सर झुकने दे, ए दिल

या ऐसा नशा दिखा दे,

जिसमें फनाह न हो

शराब पीने दे, जीने दे;

पछताने दे, ए दिल

या वो जिंदगी दिखा दे,

जिसमें गिला न हो

मौत आने दे, पाने दे

आजादी अब, ए दिल

या ऐसा रोग बता,

ये जिसकी दवा न हो!

-श्रुती अशोक..

Shruti

चोरी

गेल्या वेळी चोरीची गम्मतच झाली!

मध्यरात्री एका घरात धाड मी टाकली

लपतछपत शिरलो आत उघडून कुलुप-कडी

“चोरदादा!!” हाक येताच भिती वाटली थोडी

माझ्याकडेच टक लावून पाहत होती चिमुकली

“काय चोरतोस? मदत करू?” गोड हसत म्हणाली

“ही माझी बाहूली, लग्न करकरून कंटाळली!

बायको नसेल ना तुला? घेऊन जा या नकटीला

कडूकडू हे हळदी दूध, रोज पिणं अवघड खरं!

प्यायचं सगळं, नाटकं नकोत, तब्येतीला असतं बरं!

गृहपाठ नको नि अभ्यास नको, दप्तरसुद्धा घेऊन जा

भूगोलबिगोल नको दादा, पण मूल्यशिक्षण वाच हां!

ते दुपट्यातलं ध्यान, भाऊ माझा, लाडाकोडाचं शेंडेफळ!

ने खुशाल! पण, नको! ए, जायचं नाही हं त्याच्याजवळ!!

मौल्यवान वस्तू हवी तुला? हे तर अगदी सोपं होतं!

अमूल्य वस्तू ने, मलाच ने करून साखरेचं पोतं!!”

अट्टल चोर असलो, म्हणून काय झालं?

“नको बाळा!” म्हणताना डोळां पाणी आलं!!

-श्रुती अशोक..

Shruti

अब्रू..

अविनाशने डोळे मिटून पुन्हा एकदा उघडले. समोरची तीस मजली इमारत तशीच समोर उभी. आता विश्वास ठेवावाच लागणार. त्याला अभिमान वाटलाच देवेंद्रचा. पण असूयाही डोकावली मनात हळूच.

Shruti